आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 'Pawar Does Not Want To Give Maratha Reservation; It's Been A Year Since The Reservation Was Rejected, But Not Even An Inch Of Work Has Been Done On It SAYS Chandrakant Patil

चंद्रकांत पाटलांचा पवारांवर हल्लाबोल:'मराठा आरक्षण देण्याची पवारांची इच्छाच नाही; आरक्षण फेटाळून एक वर्ष झालं, पण त्यावर इंचभरही काम नाही'

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''शरद पवारांनी कायम जातीचे राजकारण केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची इच्छाच नाही'' अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी पवारांना लक्ष्य केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायम जातीचे राजकारण केले. भाजपला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण, भाजप कधीच त्यांच्या डावात सापडली नाही असेही ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीभाजप हा पक्ष वाढत चालला आहे. मराठा आणि ओबीसी समाजाला शरद पवार काय आहेत, हेही कळून चुकले असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''आपण मोठे व्हायचे आणि बाकी सगळे जण आपल्या गाडीमागे फिरणारे उभे करायचे. हीच त्यांची निती राहिली. ही सगळी नती उघडी पडत चालली आहे. भाजपचे कितीही नाव घेतले तरी काही फरक पडत नाही. कारण समाजाला खरे काय ते माहिती आहे. मराठा आरक्षण फेटाळून एक वर्ष झाले आहे. पण गेल्या एका वर्षात त्यांनी एक इंचही काम केले नाही. या गेल्या एका वर्षभरात कुठलीही कारवाई त्यांनी केली नसल्याचे पाटील यांनी म्हटले.

भाजप हा पक्ष नेहमी मेरीटवर चालतो-

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की रावसाहेबांच्या विधानाची पार्श्वभूमी मला माहिती नाही. पण, देवेंद्रजी ब्राम्हण आहेत म्हणून मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यांच्यामध्ये कर्तृत्व होते. म्हणून ते मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी ब्राम्हण होते, ते मुख्यमंत्री झाले. तसेच राणेही झाले. तसेच देवेंद्रजी ब्राम्हण आहेत म्हणून मुख्यमंत्री नको, असेही नाही. भाजप हा पक्ष नेहमी मेरीटवर चालतो. महाराष्ट्राने कधीच जात पाहून मुख्यमंत्री कुणाला बनवले नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे यशवंतराव नाईक हे आहेत. त्यांनी 11 वर्ष मुख्यमंत्री पद भुषवले, असे त्यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...