आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजपसाठी धोक्याची घंटा:पवार-ठाकरे पॅटर्न येणार, भाजपच्या माजी खासदाराने केले भाकित, म्हणाले - त्यांचे जागावाटपही निश्चित झालेय

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमचं सरकार जसं आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे - संजय काकडे

राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असले तरीही राजकीय समिकरणांवरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नसल्याचं असं बोललं जात असतानाच  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. भविष्यातील निवडणुका या भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढविण्याची शक्यता आहे. आता यावर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी पक्षाला धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी केलेल्या राजकीय भविष्यवाणीनुसार राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे. तसेच याबाबत जागावाटपही निश्चित झाल्याचं त्यांनी सांगितलं. टीव्ही नाइलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे. 

मुलाखतीत बोलताना माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, 'महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती भाजपासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. गेल्या 3 महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित केलं असल्याचंही काकडे म्हणाले आहे. यामध्ये राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. 

पुढे बोलताना संजय काकडे म्हणाले की, 'सरकार पाडायला हिम्मत नाही लागत, तो सगळा नंबर खेळ असतो. आमचे सरकार हे जसे आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी शिवसेना खिश्यात राजीनामे घेऊन फिरत होती. आता त्याचं काय झालं?. असा सवालही काकडेंनी शिवसेनेला विचारला आहे. यासोबतच तसेच आम्हाला सावध राहण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.