आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामोर्चा फडणवीसांच्या दृष्टीने ‘नॅनो’च:राज्यपालांना टार्गेट करत सरकारच उलथवण्याचा पवार-ठाकरेंचा इशारा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांची तातडीने हकालपट्टी करावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीने मुंबईत काढलेल्या मोर्चाला शनिवारी मोठा प्रतिसाद मिळाला. २५ मित्रपक्ष, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होते. सकाळी ११ वाजता नागपाडा येथून निघालेल्या मोर्चाचा समारोप सीएसएमटीजवळ झाला. तिथे शरद पवार, उद्धव ठाकरे व इतर नेत्यांनी मार्गदर्शन केले. राज्यपालांबाबत निर्णय घ्या, नाही तर सरकार उलथवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. शरद पवार वगळता सर्व नेते मोर्चात ५ किमी चालले.

मोर्चातील पहिला जथ्था सभास्थानी पोहोचला तेव्हा शेवटचे टोक जिथून मोर्चाला प्रारंभ झाला त्या नागपाडा परिसरात होते. देवेंद्र फडणवीस यांंनी मात्र या भव्य मोर्चाची ‘नॅनो’ अशी संभावना केली.कन्यादान सोडून पोलिस आयुक्तांनी बंदोबस्ताला दिले प्राधान्य : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचे शनिवारी लग्न होते. मात्र, शहरात भव्य मोर्चा असल्याने आयुक्तांनी कन्यादानाएेवजी कायदा व सुव्यवस्थेला महत्त्व देत बंदोबस्तास हजर राहण्यास प्राधान्य दिले.

सत्ताधाऱ्यांनो, मोर्चातून धडा घ्या युगपुरुषांबद्दल सत्तेतील लोक वापरत असलेली भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही. या मोर्चातून धडा घेतला नाही तर आपण एकत्र येऊन सरकार उलथवू. शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्र द्रोह्यांना गाडून टाकू संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर प्रथमच असा भव्य मोर्चा निघाला. ही वज्रमूठ महाराष्ट्र द्रोह्यांना मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीच. उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित देव-संतांना शिव्या देणाऱ्यांचा हा मोर्चा भव्य नव्हे तर नॅनोच होता. राजकीय हेतूने काढलेला होता. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...