आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन बिगिन अगेन:टाळेबंदीवर पवारांची नाराजी, मुख्यमंत्र्यांचेही कान टोचले? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई महानगर क्षेत्रातल्या 5 महापालिकांमध्ये शुक्रवारपासून अचानक टाळेबंदी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात अनेक ठिकाणी अचानक लावलेली टाळेबंदी, समन्वय समितीच्य बैठका न घेणे आणि २ किमी अंतरात वावरण्याच्या तुघलकी निर्णयावर पवार यांनी ठाकरे यांचे कान टोचल्याचे समजते.

मुंबई महानगर क्षेत्रातल्या 5 महापालिकांमध्ये शुक्रवारपासून अचानक टाळेबंदी लागू केली आहे. त्याची माहिती सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना नव्हती. या निर्णयासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यावर पवार-ठाकरे बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. मुंबईत दोन किमी क्षेत्रात नागरिकांनी वावर ठेवावा, असे परिपत्रक मुंबई पोलिस आयुक्तांनी काढले होते. विशेष म्हणजे याची माहिती खुद्द गृहमंत्री अनिल देशमुखांनाच नव्हती. त्यानंतर अनलाॅक २.० च्या नियमात २ किमी शब्द वगळून आसपासच्या परिसरात वावर ठेवावा, याचा अंतर्भाव करण्यात आला. 

राज्यात 19 ठिकाणी पुन्हा टाळेबंदी लागू केल्याची आपल्यालाही कल्पना नव्हती, असे पवार यांनी उद्धव यांना सांगितल्याचे समजते. आपण आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुढे जाण्याचे ठरवले आहे, त्यामुळे टाळेबंदी शक्यतो लागू करण्यात येऊ नये, असे पवार यांनी सांगितल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...