आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा कहर:जूनच्या 18 दिवसांत राज्यात रुग्णवाढीचे प्रमाण 44% वर; पारदर्शकतेकडे लक्ष द्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सिजनची पातळी घटल्याने केईएममध्ये 10 रुग्णांचा मृत्यू

गेल्या १८ दिवसांत राज्यात रुग्णवाढीचे प्रमाण ४३.८६%, तर बळींच्या संख्येत ३७.१६% वाढ झाली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थाही ढासळली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून कोरोना बळींच्या संख्येत पारदर्शकता नसल्याने त्यात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

पत्रात फडणवीस म्हणतात, १९ जूनला राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ३८२७ रुग्ण सापडले. जूनमध्ये राज्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या संख्येत ४३.८६% रुग्ण १८ दिवसांत वाढले आहेत. मुंबईत ३६.८८% रुग्ण या १८ दिवसांत वाढले आहेत. जूनच्या या १८ दिवसांत महाराष्ट्रात नवीन बळींच्या संख्येत ३७.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत ती वाढ ३५.१६ टक्के इतकी आहे याकडे फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे.

ऑक्सिजनची पातळी घटल्याने केईएममध्ये 10 रुग्णांचा मृत्यू

मुंबईतील केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुमारे १० रुग्णांचा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना त्यात मानवी चुकांमुळे बळींच्या संख्येत भर पडणार असेल तर तो प्रकार अतिशय गंभीर आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

0