आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबवत्सल हा पेंग्विनचा स्वभाव:पेडणेकरांचे भाजपला प्रत्युत्तर; तुम्ही काहीही म्हणा, ठाकरेच शिवसेना पक्षाचे कुटुंबप्रमुख

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कायम पेंग्विन असे म्हणत आलेला आहात आणि तुमचेच कितीतरी नेते 'आमची कमळाबाई जोरात' असे म्हणत आलेले आहेत. कुटुंब वत्सल हा पेंग्विनचा स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही कितीही हिणवलं, तरी आम्ही कुटुंब वत्सलच आहोत, असा टोला माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांना लगावला आहे.

तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा. उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षाचे कुटुंबप्रमुख असल्याचेही पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेच

पेडणेकर म्हणाल्या, एक झेंडा, एक नेता, आणि एक मैदान हे शिवसेनेचं ब्रिदवाक्य राहिलेलं आहे. दसरा मेळावा त्याच मैदानावर होणार. सगळे आता गजनी होऊ पाहत आहेत. मात्र, प्रशासन गजनी होणार नाही. प्रशासनाच्या लक्षात असेल की गेले कित्येक वर्ष एकाच पक्षाला आपण दसरा मेळाव्याची परवानगी देत आहोत. सध्या अनेकजण गुढीपाडवा मेळावा घेतात. वेगवेगळे कार्यक्रम शिवाजी पार्कवर होतात. मात्र दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे आणि ते गेल्यावर उद्धव ठाकरे यांनीच घेतलाय.

शिंदेंनी पवारांचा सल्ला ऐकावा

पेडणेकर म्हणाल्या, शरद पवार यांच्याकडे मराठा नेतृत्व, लोकनेता म्हणून पाहिले जाते. पंतप्रधान मोदी हे देखील शरद पवारांकडून सल्ले घेतात. तर त्यांनी जर कुठला सल्ला दिलाय, सूचना केल्या आहेत तर त्या किमान ऐकाव्यात. मात्र आता भलतेच सल्ले मिळत आहेत. असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

काय म्हणाले शरद पवार?

मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांचा हा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानतात की मैदानासाठीचा आग्रह कायम ठेवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पेंग्विन सेना वाद काय?

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यात कमळाबाई या उद्धव ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच्या कमळाला हिणवायाल बाई म्हणता. मग तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता "पेंग्विन सेना " म्हणायचे का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...