आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील कायदे हे सर्वोच्च आहेत ट्विटरला हे कायदे पाळावे लागतील, अशा स्पष्ट शब्दांमध्ये नवीन माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरला इशारा दिला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'केंद्र सरकार ट्वीटरसोबत नेमके का भांडत आहे?' असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
जगभरात आणि देशभरात ट्वीटरच्या माध्यमातून केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर लोक सध्या उघडपणे बोलत आहेत. आता टीकेचा हा भडीमार कसा थांबवायचा हा प्रश्न केंद्राला पडला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारकडून महत्त्वाचे सोशल माध्यम असेलल्या ट्वीटरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
कोणत्याही देशात त्यांच्या कायद्यांतर्गत कुठलीही यंत्रणा असेल किंवा आस्थापना असेल त्यांच्यावर नियंत्रण करणे किंवा कारवाई करणे हा अधिकार असतो. मात्र केंद्र सरकार ट्वीटरसोबत का भांडत आहे? प्रश्न आहे असेही नवाब मलिक म्हणाले. लोकांना स्पष्ट पणे मत मांडायला ट्वीटरसारखा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या बोलण्याच्या अधिकारावर गदा आणणे हे योग्य नसल्याचेही मलिक म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.