आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी महत्वाची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे गृह विभागातर्फे आज सांगण्यात आले आहे. राज्यात सुरु असलेल्या भोंगा प्रकरणानंतर ही माहिती समोर आली आहे त्या अनुशंगाने गृहविभागही अलर्ट झाला आहे.
दरम्यान हे महाराष्ट्रविरोधी षडयंत्र असल्याचा आरोपही शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. मनसेने मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर उद्या राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तत्पुर्वी राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हाही नोंदविण्यात आला. त्यामुळे आता राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या धर्तीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. यासंबंधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली यानंतर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही बैठक झाली असून या बैठकीला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
पोलिसांकडून नोटीसांचे सत्र
पोलिसांकडून राज्यातील 15 हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 13 हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती गृहविभागातर्फे देण्यात आली आहे.
काय आहे गुप्तचर विभागाच अलर्ट
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाने दिला आहे. इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे गृह विभागाने सांगितले आहे.
हे तर महाराष्ट्रविरोधी षडयंत्र
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू आहे. राज्याबाहेरील काही लोकाना इथे आणून दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वत:ची ताकद नाही, तर बाहेरून लोक आणून महाराष्ट्रात अस्थिरता आणि बेकायदेशीर कृत्य करण्याचे प्रय़त्न सुरू आहेत. अल्टिमेटमचे राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, इथे केवळ ठाकरे सरकारचा शब्द चालेल.” असेही राऊत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.