आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदकिशोर चतुर्वेदी कुणाचे 'फ्रंटमॅन' आहेत. ते कुणाचे खास माणुस अन् कुणाचे पार्टनर आहेत. त्यांच्या माध्यमातून पैसा फिरला. त्यांची चौकशी व्हावी. त्यांचा मनसुक हिरेन होऊ नये. शिवसेनेचे लोकांनी महाराष्ट्र विकायला काढला. त्यांना व्यवहारासाठी मराठी दिसत नाहीत, पटेल व चतुर्वेदी लागतात असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.
ईडीने मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी (ता. 22) कारवाई केली व 6.45 कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्ष तुटुन पडला असून टीकेचा भडीमार करीत आहे.
आधीच हाडाचे वैरी असलेल्या राणे कुटुंबातून ठाकरे कुटुंबावर प्रखर टीका केली जात आहे. पाटणकरांवरील कारवाईवरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेला लक्ष्य केले.
नितेश राणे म्हणाले, नंदकिशोर चतुर्वेदी कुणाचे 'फ्रंटमॅन' आहेत. ते कुणाचे खास माणुस अन् कुणाचे पार्टनर आहेत. त्यांच्या माध्यमातून पैसा फिरला. त्यांची चौकशी व्हावी.
मी याबाबत कागदपत्रे समोर आणले होते. आता ईडीने पाटणकर व नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या कंपन्यांवर कारवाई केली आहेच. आदीत्य ठाकरे आधी या कंपनीचे संचालक होते. आता नंदकिशोर चतुर्वेदी आहेत. ते अद्यापही समोर आले नाहीत. ते बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा मनसुक हिरेन होऊ नये, त्यांना संरक्षण द्यायला हवे असेही ते म्हणाले.
ईडी लहान लेकरू नाही
हे लोक महाराष्ट्र विकायला गेले होते. त्यांना पटेल व चतुर्वेदी दिसतात. मराठी माणसांसोबत व्यवहार का केले जात नाही अशी टीका नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली. ईडीचा गैरवापर होत असल्याच्या प्रश्नांवर ते म्हणाले की, इडी लहान लेकरू नाही. हाती काहीतरी लागले म्हणूनच त्यांनी कारवाई केली.
महाविकास आघाडी सरकारने खरी विधाने करावीत सत्यता तपासावी असेही ते म्हणाले. याच मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले, ते म्हणाले की, श्रीधर पाटणकरांविरुद्ध अनेक पुरावे माझ्याकडे आहेत पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर देत नाहीत.
सर्वात मोठे हवाला रॅकेट भाजपचे - संजय राऊत
सर्वात मोठे हवाला रॅकेट भाजपचे आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. दोन वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचे महाराष्ट्र प. बंगालमध्ये खोदकाम सुरू आहे. महाराष्ट्रातील व प. बंगालमधील सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
लक्षवेधक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.