आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रमजान आणि लॉकडाउन:कुणी म्हणते- रमजाननंतर घेऊ, तर काहींनी पहिला डोसही घेतला! मुंबईच्या मुस्लिम बहुल भागांमध्ये काय आहे लसीकरणाची स्थिती?

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भेंडी बाजारच्या गल्ल्यांमध्ये रात्रीही दिवसासारख्या हालचाली आहेत

कोरोनाच्या वाढत्या कहरात देशात लसीकरण अधिक तीव्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 1 मे पासून, 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करता येईल, परंतु लसीकरणाबद्दल लोकांमध्ये खूप संभ्रम आणि अफवा आहे.

दैनिक भास्करने मुंबईच्या मुस्लिम बहुल भाग भेंडी बाजार आणि डोंगरीमध्ये लसीकरणाच्या स्थितीचा आढावा घेतला. लोक याविषयी काय विचार करतात? रमजान आणि लॉकडाऊन सीरीजच्या दुसऱ्या रिपोर्टमध्ये आम्ही याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

भेंडी बाजारच्या गल्ल्यांमध्ये रात्रीही दिवसासारख्या हालचाली आहेत. आपापल्या घरांसमोर बसून लोक गप्पा करत आहेत. येथे आम्ही काही लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र ते सहज तयार होत नाही. मोठ्या प्रयत्नांनंतर एक सज्जन बोलण्यास तयार होता, मात्र आपले नाव सांगत नाहीत.

कोरोना इतक्या वेगाने पसरत आहे, परंतु कोणीही मास्क लावलेले दिसत नाही? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात, 'जेव्हा बाहेर जातो तेव्हा लावतो. इथे घरी कोण मास्क लावणार. श्वास गुदमरतो.' तुम्ही लस घेतली का? उत्तर मिळते- ' असे बोलले जात आहे की, 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जातेय, मात्र आमचा नंबर तर आलाच नाही आणि सध्या तर रोजे सुरू आहेत, आता रमजाननंतरच पाहू... '

भेंडी बाजारमधून डोगरीच्या रस्त्यावर आम्हाला नसीम भेटतात. तुम्हाला लसीकरणासाठी काही फोन किंवा सरकारी माणूस आला का? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणतात की, मला कुणी इंजेक्शन घेण्यास सांगितलेही नाही आणि मी घेणारही नाही. सध्या रोजे सुरू आहेत. इंजेक्शनचा प्रश्नच येत नाही.

मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि व्हॅक्सीनेशन विषयी जागृकतेसाठी देशभरात अभियान सुरू आहे. मात्र भेंडी बाजारच्या या गल्ल्यांमध्ये याचा जास्त प्रभाव दिसला नाही. निम्न-मध्यम वर्ग आणि कामगारांच्या या क्षेत्रात शिक्षण आणि जागरूकता पूर्वीपेक्षा कमी आहे. कोरोना जागरूकता असलेल्या सरकारी टीमचे येणे देखील येथे कमी आहे. अनेक वयस्कर लोकांशी बोलल्यानंतर जवळपास असेत उत्तर मिळते. मास्क आणि लसीकरणाचा प्रश्न लोक हसण्यावारी घेतात.

डोंगरी दर्गाजवळ खूप हालचाली सुरू आहे. तेथील दुकानावर बसलेले अकबर म्हणतात, 'मला काही लोक म्हणाले होते की, चचा व्हॅक्सीन घ्या, मात्र मी ती घेतली नाही. व्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना हत आहे, मग काय फायदा. मी तर मास्कही घालत नाही. फक्त गळ्यात अडकवून टेवतो. दादर, बांद्रा येथे गेलो तरीही चेकिंग होते यामुळे मग लावतो.'

येथे जवळच बसलेले जमाल मास्कचा उल्लेख झाल्यावर बोलतात, 'मी तर मास्क लावत नाही. नागपाडा, माहिम, मुंबई सेंट्रलला नेहमीच येत जात असतो. कुणीच टोकले नाही. पंतप्रधान मोदी स्वतः मास्क घालत नाहीत. ही फक्त 200-500 रुपयांचा फाइन बनवून सर्वांना लुटण्याची पध्दत आहे.'

व्हॅक्सीन लावली तुम्ही? यावर जमाल म्हणतात की, 'मला तर कुणी व्हॅक्सीनसाठी विचारले नाही. कोणताही सरकारी कागद आला नाही. तसे हा कोरोना काही नाही, फक्त भास आहे. अल्लाह जे करतो, ते चांगले करतो'

भेंडी बाजार ते डोंगरीपर्यंतच्या अनेक लोकांशी बोलताना असे आढळले की इथले बहुतेक लोक या लसीबाबत गंभीर नाहीत. काहींसाठी कोरोना एक विनोद आहे आणि काही त्याबद्दल उदासीन आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांना हेसुद्धा माहिती नाही की सरकारकडून लसीकरण विनामूल्य केले जात आहे. या क्षणी, अधिकृतपणे, लस जनजागृतीसाठी काहीही घडलेले दिसत नाही. लोक म्हणतात की ना येथे कुठलाही शिबिर आयोजित केलेला नाही किंवा कोणीही आम्हाला काही सांगण्यासाठी आले नाही. भाजप नेते आणि रीता फाउंडेशन नावाचा एक एनजीओ चालवणारी रीता निलेश सिंह या देखील जागरुकता कमी असल्याचे मान्य करतात. त्यांच्या एनजीओने मुंबईच्या पठानवाडी भागांमध्ये कँप लावून व्हॅक्सीनेशन केले आहे. एनजीओने आतापर्यंत 240 लोकांना व्हॅक्सीन दिली आहे.

हो, एक वर्ग असाही आहे जो व्हॅक्सीनप्रती जागरुक आहे. मात्र त्यांच्या मनात हा प्रश्न आहे की, रमजानमध्ये व्हॅक्सीन घ्यावी की नाही? उबेज खान म्हणतात, 'माझ्या घरात अजून कोणीच व्हॅक्सीन घेतलेली नाही. मात्र हे आवश्यक आहे. सध्या रमजान सुरू आहे, रमजाननंतर पाहू' मात्र लस तर रमजानमध्येही घेऊ शकतो, हे तर औषध आहे? याच्या उत्तरावर उबेज गोंधळून म्हणतात की, 'नाही रमजानमध्ये कोणतेही औषध शरीरामध्ये घेऊ शकत नाही.'

मात्र, रहमान शेख याविषयी जास्त जागरुक दिसतात. ते म्हणतात की, 'माझे वय 32 वर्षे आहे. माझ्या वयाच्या लोकांना लसी देण्यास सुरुवात झाल्यानंतर मी लगेच व्हॅक्सीन घेईल.' अनेक लोक रोजे असल्याने सध्या लस घेणे टाळत आहेत, या प्रश्नावर रहमान म्हणतात, 'ही जागरुकतेची कमतरता आहे. माझे अम्मी-अब्बा दोघांनीही व्हॅक्सीनचा एक डोज घेतला आहे आणि रोजेही ठेवत आहेत. जर दुसऱ्या डोजचा नंबर रमजानमध्ये आला तरही व्हॅक्सीन घेऊ.'

ते पुढे म्हणतात, 'या परीसरांमध्ये सरकारकडून कोणीही कोरोना आणि व्हॅक्सीनविषयी सांगण्यासाठी आले नाही. लोकांच्या मनात गैरसमज आहेत, त्या दूर केल्या जाऊ शकत नाही. यामुळे हे लोक घाबरत आहेत. दुसरे म्हणजे शिक्षण आणि जागृकतेचा अभाव आहे.'

रात्रभर भेंडी बाजार आणि डोंगरी फिरता-फिरता सकाळ झाली असती. जवळच्या मशीदीतून सहरीच्या घोषणेवेळी म्हटले जाते की, रोज्याची नीयत करा. लोक लवकरच सर्व काम सोडून सहरीच्या तयारीला लागतात.

धार्मिक-सांस्कृतिक आवाहनाचा परिणाम खूप खोलवर होतो. जर या परिसरांमध्ये सरकारी जागृकतेच्या कार्यक्रमांसह इस्लामिक धर्मगुरूही व्हॅक्सीनेशन आणि मास्कच्या आवश्यकतेविषयी आवाहन करतील तर याचा जास्त फायदा होईल.

बातम्या आणखी आहेत...