आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:भाजप रसातळाला जाईल लोकांना वाटलं पण तसं होत नाही, रामदेव बाबा यांनी उद्धव ठाकरेंचा थोपटली पाठ

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: लोकांना वाटलं होतं पाच राज्यांमध्ये भाजप रसातळाला जाईल पण तसं होत नाहीये. सोशल मिडियावर तसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र तसं होणार नाही. भाजपसोबत आता केजरीवाल सुद्धा चांगली कामगीरी करतील, असे वक्तव्य करतांनाच मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्या सारखा अशी कौतुकाची थाप रामदेव बाबांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

योगगुरू रामदेव बाबा योग शिबिरासाठी सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर या ठिकाणच्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट दिली. यावेळी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळेल असं एग्झिट पोलमधून दिसत आहे असं योगगूरू रामदेव बाबा म्हणाले.

सध्या काँग्रेसचा राज्य स्तरावर नेतृत्वाचा अभाव असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वात ओजस्वीत मिळाली तर काँग्रेस अधिक बळकट होईल. या निवडणुकीत सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल, असं मत देखील रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे अतिशय चांगलं काम करत असल्याची कौतुकाची थाप रामदेव बाबा यांनी यांनी दिली. दरम्यानं महाराष्ट्रात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या धाड सत्रावर बोलताना दोन वजीर लढत आहेत असं देखील रामदेव बाबा म्हणाले. वीर सावरकर हे भारतरत्न असून त्यांना भारतरत्न मिळायला हवं. असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...