आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (ता. ५) पर्यावरण विभागाकडून ‘माझी वसुंधरा अभियान’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम एनसीपीए थिएटरमध्ये पार पडला. पर्यावरण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, महापालिका, महानगरपालिका त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. पुरस्कारार्थींच्या नावात चुका असल्याचे तसेच कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले नसल्याचे लक्षात आल्यावर अजित पवार यांनी विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
राज्यातील ८० पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्था व अधिकाऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. अजित पवारांना कार्यक्रमाच्या आयोजनात त्रुटी दिसल्या. त्यावर बोट ठेवत पवार म्हणाले, अनेक ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी, सरपंच, नगराध्यक्ष, महापौर म्हणून काम करत होते. मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांनी ते काम सांभाळले. त्यामुळे या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींनाही बोलवायला हवे होते. ही अक्षम्य चूक आहे, या शब्दांत पवारांनी खडे बोल सुनावले.
पुरस्कारार्थींच्या प्रमाणपत्रांवर चुका
पुरस्कारार्थींना दिलेल्या काही प्रमाणपत्रांवर कोल्हापूर जिल्हा नमूद केले होते. प्रत्यक्षात ते वेगळ्या जिल्ह्यातील पुरस्कार होते. तो धागा पकडत पवार म्हणाले, शासन जेव्हा १०० कोटींचा निधी देते तेव्हा तो माझ्या घरचा निधी देत नाही. जनतेचा पैसा आहे. त्यामुळे त्याचे वाटपही नीट व्हायला हवे. हे असे चालणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री पवारांनी विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना खडे बोल सुनावले.
तोपर्यंत मी जगेन का माहीत नाही
पर्यावरणतज्ज्ञांनी २०५० मध्ये मुंबई पाण्याखाली जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तिथपर्यंत मी जगेन का माहीत नाही. आता तुमचे तुम्ही बघा, असे पवार म्हणताच सभागृहात जोरदार हशा पिकला. “मला चूक दिसली तर मी चुका काढणार. चांगले दिसले तर अभिनंदन करणार. दीडशे नव्हे, दोनशे कोटी देतो. पण चित्र बदलून टाका. जे चुकले असतील त्यांना निलंबित करा. चुकीला माफी नाही, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.