आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्ष भाजपला दणका दिला देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. 'लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. याउलट राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी', असा टोला चंद्रकांत पाटलांनी सोशल मीडियावरुन लगावला.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'महाविकासआघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे. त्यासाठी सरकारचे आभार! राज्यात कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही राज्य सरकारला विनंती करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ठीक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही.'
लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. राज्य सरकारने हिच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी. pic.twitter.com/1JWV7jWeF2
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 10, 2021
'आम्हा सर्वांच्या सुरक्षा ताफ्यातून ज्या पोलिस जवानंना वगळण्यात आले आहे. त्यांना महिला सुरक्षेचा विशेष कार्यभार देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षेची खरी गरज लोकप्रतिनिधींना नसून जनतेला आणि महिलांनाच आहे. पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षा कवच आहेत. त्यामुळे आमची काळजी न करता राज्यातील सुव्यवस्था नीट राहावी, याकडे राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे.
'पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारवर वाभाडे निघत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची उर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी, अशी अपेक्षा आहे', अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमधून केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.