आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंगचा आरोप:नवाब मलिकांची संपत्ती जप्त करण्यास मंजुरी; मुंबईसह उस्मानाबादच्या 147 एकर शेतीवर टाच

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यास सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परवानगी दिली आहे. या कारवाईत मलिक यांच्या नातेवाइकांच्या नावे असलेल्या मालमत्तेवरही टाच येणार आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकरशी आर्थिक व्यवहार केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मलिक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इथे आहेत मालमत्ता गोवावाला कंपाउंडमधील जागांच्या भाड्यातून मलिक यांनी वांद्रे, कुर्ला येथे फ्लॅट घेतल्याचा आरोप आहे. तसेच उस्मानाबाद येथे १४७ एकर शेतजमीन खरेदी केल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...