आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लालपरीची जिल्हाबंदी उठणार:एसटी लवकरच जिल्ह्याबाहेर धावणार, आठवडाभरात निर्णय; आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवारांचे संकेत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन सरसकट उठवण्याची राज्य सरकारला घाई नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याची लालपरी म्हणजे एसटी लवकरच जिल्ह्याबाहेर धावणार आहे, असे संकेत राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्य सरकारने एसटी सुरू करण्यासाठी अभ्यास केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यासंदर्भात बोलणे झाले आहे. त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. आठवड्यात हा निर्णय होईल. क्षमतेच्या निम्म्याने सेवा चालवली जाईल, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले. राज्यात २५ मार्चपासून एसटी सेवा पूर्ण बंद आहे. त्यानंतर २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू झाली. मात्र आंतरजिल्हा सेवा अद्याप बंदच आहे. त्या सेवेचा प्रारंभ करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

लॉकडाऊन कायम राहणार

लॉकडाऊन सरसकट उठवण्याची राज्य सरकारला घाई नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सच्या डाॅक्टरांशी शनिवारी रात्री व्हर्च्युअल संवाद साधला. त्यात त्यांनी लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात हे विधान केले.