आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 दिवसांत 13वी दरवाढ:आजही पेट्रोल 85 पैशांनी तर डिझेल 84 पैशांनी महागले, परभणीत पेट्रोलचे सर्वाधिक 122 रुपये प्रतिलिटर दर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आजदेखील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 85 पैशांनी तर डिझेलच्या दरात 84 पैशांनी वाढ केली आहे. मागील 15 दिवसांत ही 13व्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दोनच दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल 9 रूपये 20 पैशांनी वाढ झाली आहे. सातत्याने होणाऱ्या या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशावर आता चांगलाच बोझा पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे देशभरात या पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ बसत असली तरी महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. कारण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत.

देशात परभणीत उच्चांकी दर
देशभरात परभणीत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. आज परभणीत एक लिटर पेट्रोलचे दर 122.01 रुपये, तर डिझेलचे दर 104.62 रुपयांवर गेले आहे. याशिवाय मुंबई शहरात आज पेट्रोलचा दर 84 पैशांनी वाढून 119.67 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 85 पैशांनी वाढून 103.92 रुपये प्रति लिटर झाला आहे. पुण्यात आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 119.07 रुपये तर डिझेलचा दर 101.78 रुपयांवर पोहोचला आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 119.11 रुपये तर डिझेलचा दर 101.83 रुपये प्रति लिटर झाला आहे. नागपुरात पेट्रोल 119.33 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 102.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. औरंगाबादमध्येदेखील पेट्रटोलने 120 रुपये प्रतिलिटरची पातळी ओलांडली आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत दिल्ली, चेन्नईसारख्या महानगरांमध्ये इंधन स्वस्त
दिल्ली, चेन्नई, कोलकाता या महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल महागडे आहे. तर राज्यातील इतर भागांत पेट्रोलचे दर मुंबईहून अधिक आहेत. आज इंधन दरवाढ झाल्यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर 104.61 पैसे प्रतिलिटर आहे. तर डिझेलचे दर 95.87 रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत मात्र हे दर अनुक्रमे 119.67 रुपये आणि 103.92 रुपये आहे. म्हणजेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोल तब्बल 15 रूपये महाग मिळत आहे. याशिवाय चेन्नईमध्येदेखील पेट्रोल 110.11 प्रति लिटर आणि डिझेल 100.19 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यातही पेट्रोलजे दर 114.28 रूपये प्रतिलिटर आणि डिझेलचे दर 99.02 रुपये प्रतिलिटर आहे.