आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Petrol Diesel Price Hike| Congress Leaders Protest Over Increase In Petrol And Diesel Prices In Many Cities Of The State Including Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन:पेट्रोल-डिझेल दरवाढीचा काँग्रेस नेत्यांनी नोंदवला निषेध, आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गाड्या खेचून आंदोलन केले - Divya Marathi
पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गाड्या खेचून आंदोलन केले
  • काँग्रेसचे आजचे आंदोलन बेगडी, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल

राज्य काँग्रेसच्या वतीने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात विरोधात राज्यभरात आंदोलन केले आणि ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. राज्यातील विविध शहरांत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोरीने वाहने खेचून या दरवाढीचा निषेध केला. पक्षाच्या एका जेष्ठ नेत्यांने सांगितले की, लोक आधीपासून कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळे त्रस्त झाले आहेत. यामुळे अशात केंद्राने इंधनाचे दर कमी करावेत.   

या नेत्यांनी मुंबईत निदर्शने केली

बाळासाहेबत थोराट, अशोक चव्हाण आणि नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसच्या इतर मंत्र्यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात निदर्शन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री थोराट म्हणाले की, "केंद्राने गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. लोक आधीच लॉकडाऊनने प्रभावित झाले असल्याने ही दरवाढ कमी केले पाहिजे."

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासमवेत सांगलीत निषेधाचे नेतृत्व केले. याशिवाय डिझेल आणि पेट्रोलच्या दरात होणार्‍या वाढीविरोधात राज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात निदर्शने केली.

मुंबई, पुणे, नागपूर, सांगली येथे असे आंदोलन पाहायला मिळाले.
मुंबई, पुणे, नागपूर, सांगली येथे असे आंदोलन पाहायला मिळाले.

काँग्रेसचे आजचे आंदोलन बेगडी : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

दरम्यान काँग्रेसच्या आजच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सरकारी नियंत्रणातून काँग्रेसनेच मुक्त केले. 2018 मध्ये जेव्हा अशाच प्रकारची दरवाढ झाली, तेव्हा 4 ऑक्टोबर 2018 रोजी 5 रूपयांचा दिलासा राज्यातील नागरिकांना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला होता. 

इंधनाचा जीएसटीत समावेश नसल्याने त्यावर व्हॅट आकारला जातो. आताच्या सरकारने अर्थसंकल्पात एक रूपया अधिभार आणि 1 जूनपासून 2 रूपयांची वाढ अशी 3 रूपये वाढ केली आहे. काँग्रेस सत्तेत असल्याने त्यांचे आजचे आंदोलन बेगडी आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी रस्त्यावर दोरीच्या सहाय्याने गाडी खेचून निदर्शने केली.
मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी रस्त्यावर दोरीच्या सहाय्याने गाडी खेचून निदर्शने केली.

तीन आठवड्यांत 22 वेळा वाढले डिझेलचे दर 

डिझेलच्या दरात तीन आठवड्यांत 22 वेळा वाढ झाली. या वाढीसोबत सोमवारी डिझेल नव्या उच्चांकावर पोहचले. डिझेलच्या किमतीत आतापर्यंत 11.14 रुपयांची वाढ झाली.  सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या किंमती अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर पाच पैसे आणि डिझेलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली आहे. 7 जूनपासून, डिझेलच्या किंमती 22 व्यांदा आणि पेट्रोलच्या किमतीत 21 व्यांदा दरवाढ करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...