आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच राज्यातील निवडणुकानंतर पेट्रोलच्या किंमती वाढताना दिसून येत आहे. आजही मुंबईत 84 पैशांनी पेट्रोलचा दर वाढला आहे. गेल्या 13 दिवसात पेट्रोलच्या किंमतीत 11 व्या वेळेस वाढ झाली आहे. आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत 8 रुपयांनी वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर 118. 41 रुपयांवर जाऊन पोहचला आहे. तर डिझेलने देखील शंभरी पार केली आहे. मुंबईत आज डिझेलचा भाव 102.64 रुपये प्रति लीटर झाला आहे.
13 दिवसांत 11 वेळा वाढले भाव
गेल्या 13 दिवसांत म्हणजेच 22 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 11 वेळा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, 24 मार्च आणि 1 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही, त्यामुळे देशभरातील किमती स्थिर होत्या.
शहर | पेट्रोल | डिझेल |
मुंबई | 118 | 102 |
ठाणे | 117.68 | 100.48 |
औरंगाबाद | 119.78 | 102.45 |
लातूर | 119.26 | 101.95 |
जालना | 120.26 | 102.90 |
नांदेड | 120.62 | 103.26 |
परभणी | 121.38 | 103.97 |
पालघर | 118.10 | 100.79 |
दरवाढीचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका
पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या दरवाढीचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसतो आहे. मराठवाड्यातील परभणीत पेट्रोल सर्वात महाग असल्याचे दिसून येत आहे. तर पालघरमध्ये सर्वांत स्वस्त पेट्रोल मिळत आहे.
खनिज तेलाचे दर वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेल महाग
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर वाढत असल्याने भारतात इंधनाचे दर वाढत आहेत. मागील आठवड्यापासून सतत दरवाढ सुरू आहे. भारतीय कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार मुंबईत इंधनदरात 84 पैशांची वाढ झाली आहे. त्यानुसार आज मुंबईत पेट्रोल 118.41 रुपये आणि डिझेल 102.64 रुपये प्रति लीटर झाले आहेत
मूडीजचा दावा खरा ठरतोय
मूडीज रेटिंग एजन्सीने एक अहवाल जारी केला होता की, भारतातील सर्वोच्च किरकोळ इंधन विक्रेते IOC, BPCL आणि HPCL ने नोव्हेंबर ते मार्चदरम्यान सुमारे 2.25 अब्ज डॉलर्सचा (रु. 19 हजार कोटी) महसूल गमावला आहे. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, नुकसान टाळण्यासाठी सरकारने रिफायनरीला किमती वाढवण्याची परवानगी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. सलग दोन दिवस 80-80 पैशांनी वाढ केल्यानंतर, मूडीजने म्हटले होते की, हे सूचित करते की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एकाच वेळी न वाढवता त्या हळूहळू वाढतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.