आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Petrol diesel Price Hiked 12 Times In 14 Days, Petrol diesel Price Hiked By Rs 8.40 So Far

14 दिवसांत पेट्रोल 8.40 रुपयांनी महागलं:आज 12व्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, आता मुंबईत पेट्रोलने 118 रुपयांचा टप्पा पार केला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 100 डॉलरच्या जवळ आली असली, तरी भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा ट्रेंड कायम आहे. दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40-40 पैशांनी वाढ झाली आहे. यासह दिल्लीत आज पेट्रोलचा दर 103.81 रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याचवेळी डिझेलचा दर 95.07 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 14 दिवसांत आज 12व्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 22 मार्चपासून दरवाढीची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यान, 24 मार्च आणि 1 एप्रिल या दोनच दिवसांसाठी किमती वाढल्या नाहीत.

दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मुंबईत पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकले जात आहे. तर, पुणे शहारत 118.29 रुपयांवर पोहचला आहे. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोतला आहे.

देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील शहरांचा भाव

  • 1.देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 103.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर, डिझेलचा दर 95.07 रुपयांवर पोहोचलाय.
  • आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचा दर 118.81 रुपये तर डिझेलचा दर 103.04 पैशांवर पोहोचला आहे. आज लीटरमागे 40 पैशांची वाढ झाली आहे.
  • चेन्नईतील पेट्रोलचा दर 109.36 रुपयांवर डिझेलचा दर 99.44 वर पोहोचला आहे.
  • कोलकातामधील पेट्रोलचे दर 113.43 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेल 98.22 रुपयांनी विकले जात आहे.
  • पुण्यात पेट्रोलचे दर देखील वाढले आहेत. पेट्रोलचे दर 118.29 रुपयांवर पोहोचले आहेत. तर पॉवर पेट्रोलचे दर 122.79 रुपयांना विकलं जातंय. डिझेलचे पुण्यातील दर 101.01 वर पोहोचले आहेत. तर,सीएनजी गॅसची किंमत 62.20 रुपयांवर पोहोचले आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरे

पेट्रोलडिझेल
मुंबई118.83103.07
पुणे118.41101.13
नाशिक118.95101.65
औरंगाबाद120.28102.85
जळगाव119.51102.18
बातम्या आणखी आहेत...