आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुका जवळ आल्या:प्रथमच कमी झाल्या पेट्रोल आणि डीझेलच्या किमती; पेट्रोलच्या किमतींमध्ये प्रति लिटर 18 तर डीझेलच्या किमतीत 17 पैशांची घट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जानेवारीत 10 वेळा वाढल्या इंधनाच्या किमती, 27 फेब्रुवारीपासून स्थिर

गेल्या 24 दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये प्रथमच घट झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 5 राज्यांतील निवडणुका जवळ आल्या तरी हा एक योगायोग मानला जावा. त्यातही महत्वाचे म्हणजे, इतके दिवस इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली त्या मानाने ही घट कवडीमात्र आहे. पेट्रोलच्या किमतींमध्ये प्रति लिटर 18 तर डीझेलच्या किमतीत प्रति लिटर 17 पैशांची घट करण्यात आली आहे.

24 मार्च रोजी दिल्लीत पेट्रोल 18 पैसे तर डीझेल 17 पैशांनी स्वस्त झाले. दिल्लीत बुधवारी पेट्रोलचे दर 90.99 रुपये आणि डीझेलचे दर 81.30 रुपये प्रति लिटर आहेत. मुंबईत पेट्रोल 97.40 आणि डीझेल 88.42 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सुद्धा घट झाली आहे. गेल्या 15 दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये 10% घट झाली. सद्यस्थितीला कच्चा तेलाच्या प्रति बॅरल किमती 64 डॉलर आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला त्याची किंमत 71 डॉलर प्रति बॅरल होती. इंधनाची कमी झालेली मागणी कमी झाली आहे. युरोपियन देशांमध्ये कोरोनामुळे लागू केला जाणारा लॉकडाउन याचे एक मुख्य कारण आहे.

देशात 27 फेब्रुवारीनंतर पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढल्या नाहीत. तत्पूर्वी केवळ 6 दिवसांत पेट्रोलच्या किमती 4.62 रुपये आणि डीझेलच्या किमती प्रति लिटर 4.74 रुपयांनी वाढल्या. त्यापूर्वी जानेवारीत इंधनाच्या किमतींमध्ये 10 वेळा वाढ करण्यात आली. ही वाढ पेट्रोलमध्ये 2.59 रुपये आणि डीझेलमध्ये प्रति लिटर 2.61 रुपयांची होती. गेल्या काही दिवसांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या होत्या. कारण, काही तेल उत्पादक देशांनी एप्रिलपर्यंत पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...