आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंधन दरवाढ:पेट्रोल-डिझेलचे भाव आज पुन्हा वाढले, गेल्या 3 आठवड्यात पेट्रोल प्रतिलिटर जवळपास 9.17 रुपये, तर डिझेल 11.13 रुपयांनी महागले 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग 21 दिवस सुरु असलेली इंधन दरवाढ केवळ रविवारच्या दिवशी थांबली होती. मात्र सोमवारचा दिवस उजालड्यानंतर इंधन दरवाढीची घोडदौड पुन्हा सुरु झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये मुंबई-दिल्लीसह देशाच्या बहुतांश भागात पुन्हा वाढ झालेली आहे. गेल्या तीन आठवड्यात पेट्रोल प्रतिलिटर जवळपास 9.17 रुपये, तर डिझेल 11.13 रुपयांनी महागले आहे.

आता या वाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोल 87.17 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 78.81 रुपये प्रतिलिटर दर असणार आहे. पेट्रोल 5 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 12 पैसे प्रतिलिटर महाग झाले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल 80.43 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 80.53 रुपये प्रतिलिटर दर आहे. डिझेलच्या किमती पेट्रोलपेक्षा जास्त असल्याचे चित्र दिल्लीत पाहायला मिळत आहे.

जवळपास 21 दिवस सलग इंधन दरवाढ झाली होती. यानंतर ला म्हणजेच रविवारी इंधनदरवाढ झाली नाही. मात्र या एका दिवसाच्या विश्रांतीनंतर इंधनदरवाढीची घौडदौड आज पुन्हा सुरू झाली आहे. काल (रविवारी) वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला होता. पेट्रोल डिझेलचे भाव काल स्थिर राहिले होते. मात्र हा दिलासा केवळ एक दिवसाचा ठरला.

बातम्या आणखी आहेत...