आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेलमध्ये पुन्हा दरवाढ:मुंबईत पेट्रोल 99.59 रुपये तर डिझेल 91.30 प्रति लिटर, 15 दिवसात तब्बल 11 वेळा वाढ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सतत होणारी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब बनत चालली आहे.

महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असताना आता पेट्रोलने देखील मुसंडी मारलेली आहे. मुंबई शहर आणि परिसरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल 99.59 रुपये तर डिझेल 91.30 रूपयांनी विक्री होत असून पेट्रोलच्या दराची शंभरी पुर्ण होण्यासाठी फक्त 50 पैसे बाकी आहेत.

कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउन व इतर कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मालवाहतूक बंद असल्याच्या कारणास्तव सर्वच जीवनाश्‍यक वस्तूंचे दर गेल्या काही दिवसांत वाढले असून दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. इतर वस्तूंच्या वाढलेल्या दराचे चटके सोसत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर शंभरीच्या घराकडे झेपावत आहेत. पेट्रोल 17 पैसे तर डिझेल 30 पैश्यांनी महागले आहे

साधारणपणे 2 मे पासून सूरू झालेली ही दरवाढ थांबण्याचे काही नावं घेत नाही. गेल्या 15 दिवसात मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत तब्बल 11 वेळा वाढ झाली आहे. अगोदरच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता सतत होणारी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब बनत चालली आहे.

बातम्या आणखी आहेत...