आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल 5 तर डीझेल 10 रुपयांनी स्वस्त:भाजपला जितक्या वेळा पराभूत करणार तितक्या वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार! नवाब मलिकांचा टोला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षभरापासून त्रस्त झालेल्या इंधन दरावाढीपासून केंद्र सरकारने दिवाळीच्या पुर्वसंध्येला काहीसा दिलासा दिला आहे. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून संपुर्ण देशभरात याची अमंलबजावणी केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक जण टीका करत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील टीका म्हटले होते की, पोटनिवडणुकांमध्ये अपयश आल्याच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला. तर शिवसेने खासदार संजय राऊत यांनी देखील टीका करत म्हटले होते की, 50 रुपये कमी करायचे असेल तर भाजपचा संपुर्ण पराभव करावे लागेल. त्यानंतर आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"भाजपाचा तुम्ही जितक्या वेळ पराभव करणार तितकाच पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील, ही लूट थांबवायची असले तर भाजपचा पराभूत करा" अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. मलिकांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यासाठी जनतेला विनंती केली आहे की, भाजपाचा पराभव करा जेणेकरून आणखी दर कमी होतील.

पेट्रोलची किंमत 50 रुपये करायची असले तर भाजपचा पराभव करा

"पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोलची किंमत 5 रुपये कमी झाली 50 रुपये कमी करायचे असतील कर भाजपचा संपुर्ण पराभव करावा लागेल" असे संजय राऊत म्हणाले. दिवाळी साजरी करण्यासारखे वातावरण नाही. महागाई खूप वाढली आहे, दिवाळी कशी साजरी करणार."

लोकांना कर्ज काढून सण साजरे करावे लागत आहे, तरी देखील आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो, 2024 साली हे ही दिवस बदलतील. अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. "मोठे मन दाखवायला मन असायला पाहिजे, केंद्राने किमान 25 रुपये कमी करायला पाहिजे होते. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून बेहिशेबी पैसे सरकारने कमावले आहेत" असे देखील राऊत म्हणाले.

हा तर भीतीपोटी घेण्यात आलेला निर्णय

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्राच्या या निर्णयाची खिल्ली उडवत, भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आला असे म्हटले आहे. प्रियंका यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "हा तर भीतीपोटी घेतण्यात आलेला निर्णय आहे. मनापासून नाही. वसूली सरकारला आपण येणाऱ्या निवडणुकीत या लुटीचे उत्तर नक्कीच देऊ" असे ट्विट करत प्रियंकाने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

इंधनमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते, त्यावर आता दिवाळी तोंडावर मोदी सरकारने दिलासा देण्याच्या नावावर पेट्रोलमध्ये पाच रुपये तर डिझेलमध्ये दहा रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याची राजधानी मुंबईत पेट्रोल हे 115 रुपयांच्या पार गेले होते. तर दिल्लीत देखील पेट्रोलसाठी 110 रुपये मोजावे लागत होते.

बातम्या आणखी आहेत...