आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:फोन टॅपिंग प्रकरणाचा 3 महिन्यात छडा लागणार, भाजपच्या काळातील फोन टॅपिंगची होणार पडताळणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

२०१५ ते २०१९ या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार आहे, त्यासाठी पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय समिती शुक्रवारी गठीत करण्यात आली आहे. ही समिती फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करेल. तसेच अनिष्ट हेतूने फोन टॅप केले होते काय ‌? याची चौकशी करेल. तसे झाले असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि उचित कार्यवाही करण्यात येणार आहे.

यासंदर्भातला अहवाल पुढील तीन महिन्यात गृहविभागाला सादर करण्यात येणार आहे. या उच्चस्तरीय चौकशी समितीचे राज्याचे पोलिस महासंचालक अध्यक्ष आहेत. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त व अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष शाखा) हे दोन चौकशी समितीचे सदस्य आहे. याबाबतचा मुद्दा नुकत्याच झालेल्या अधिवेशनात गाजला होता.

बातम्या आणखी आहेत...