आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन टॅपिंग प्रकरण:पोलिस महासंचालक, कुंटे यांच्या परवानगीनेच फोन टॅपिंग; आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांची हायकोर्टात माहिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • . एस. एस. शिंदे व न्या. एन. जे.जमादार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे

पोलिस दलात क्रीम पोस्टिंग आणि बदल्यांतील भ्रष्टाचारावर निगराणी ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. शुक्लांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानींनी बाजू मांडली. सीआयडीच्या प्रमुख असताना शुक्ला यांना तत्कालीन पोलिस महासंचालकांकडून काही फोन नंबर्सवर निगराणी ठेवण्याचे आदेश मिळाले होते.

पोलिस दलात मोक्याच्या ठिकाणी नियुक्ती आणि बदल्यांसाठी कार्यरत दलालांचे काही राजकीय नेत्यांशी लागेबांधे होते. गलेलठ्ठ रकमा घेऊन या बदल्या होत होत्या, असे जेठमलानी यांनी न्यायालयास सांगितले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे.जमादार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार शुक्ला यांनी तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही परवानगी घेतली होती.

दरम्यान, १७ जुलै ते २९ जुलै २०२० दरम्यान निगराणी करण्याची परवानगी कुंटे यांनी दिली होती. २५ मार्च २०२१ रोजी कुंटे यांनी दिलेल्या अहवालातही हे नमूद आहे. मात्र नंतर परवानगी मिळवताना आपली दिशाभूल केली, असा दावा कुंटे यांनी करून शुक्ला यांना बळीचा बकरा बनवले, असा युक्तिवाद त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...