आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS नवरात्रोत्सवासाठी अमृता-देवेंद्र फडणवीस ठाण्यात:दांडियात अक्षय कुमार, सई, अनन्या पांडेसह लावली हजेरी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल ठाण्यातील नवरात्र मंडळाला भेट दिली. टेंभीनाका येथील मानाच्या जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या दुर्गेश्वरी देवीची अमृता व देवेंद्र फडणवीस यांनी पूजा केली.

सिनेतारकांची हजेरी

डोंबिवलीमध्ये दोन गरबा उत्सवांनाही अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार व अभिनेत्री सई ताम्हणकर व अनन्या पांडेही उपस्थित होते. या गरबा उत्सवात अमृता यांनी गाणे गायले तसेच, ढोलही वाजवला. आमदार निरंजन डावखरेही यावेळी उपस्थित होते.

टेंभीनाका येथील दुर्गेश्वरी देवीची अमृता व देवेंद्र फडणवीस यांनी पूजा केली.
टेंभीनाका येथील दुर्गेश्वरी देवीची अमृता व देवेंद्र फडणवीस यांनी पूजा केली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर अनेक प्रमुख नेते व कलाकार नवरात्रोत्सवासाठी ठाण्यात येत आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर अनेक प्रमुख नेते व कलाकार नवरात्रोत्सवासाठी ठाण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी अमृता व देवेंद्र फडणवीसांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी अमृता व देवेंद्र फडणवीसांचे स्वागत केले.
टेंभीनाका येथील मानाची जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाची दुर्गेश्वरी देवी.
टेंभीनाका येथील मानाची जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाची दुर्गेश्वरी देवी.
बातम्या आणखी आहेत...