आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिठाणीला अटक:अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला अटक, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला शुक्रवारी अटक करण्यता आली आहे. सुशांत सिंग राजपूतला ड्रग्स दिल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी ब्युरो एनसीबीने केली आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. यापूर्वी त्याचे मित्र सिद्धार्थ पिठाणी, नीरज सिंह यांची डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये चौकशी देखील झाली होती. दरम्यान, यामध्ये अमली पदार्थांच्या प्रकरणाचा तपास नार्कोटिक्स करत असल्यामुळे यामध्ये आज सिद्धार्थ पिठाणीला अटक करण्यात आली. पिठाणी आजच कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

सिद्धार्थ पिठाणी हा सुशांत सिंग राजपूतचा केवळ मित्रच नव्हे, तर रूम पार्टनर देखील होता. यापूर्वी एनसीबीने सुशांत आत्महत्या प्रकरणात इतरांना सुद्धा अटक केली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी आधी सीबीआयला देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाला ड्रग्सचे वळण लागले आणि एनसीबीची एंट्री झाली. या प्रकरणात अनेक सिलेब्रिटींना ताब्यात घेऊन यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...