आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Piyush Goyal Mother Death Update : BJP Leader Piyush Goyal Mother Chandrakanta Goyal Dies In Mumbai; Railway Minister Shared Emotional Post On Twitter

निधन:रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या आई तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चंद्रकांता गोयल यांचे मुंबईत निधन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी रात्री झाले निधन, शनिवारी सकाळी करण्यात आले अंत्यसंस्कार

केंद्रीय रेल्वे मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शुक्रवारी रात्री मुंबईत निधन झाले. पीयूष गोयल यांनी ट्विट करून नुकतीच ही माहिती जारी केली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, 'तिने आपले समस्त आयुष्य इतरांची सेवा करण्यातच घालवले. आपल्या सेवाभावने आम्हाला देखील तिने प्रेरित केले आहे.' भाजप नेते आणि राज्यातील माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितप्रमाणे, चंद्रकांता गोयल यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळीच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

तीनदा आमदार होत्या चंद्रकांता गोयल

आपल्या मुलाप्रमाणेच चंद्रकांता गोयल सुद्धा राजकारणी होत्या. त्या आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला मुंबईत नगरसेविका होत्या. त्यानंतर माटुंगा येथून एक दोन नव्हे, तर तीनदा आमदार होत्या. भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या चंद्रकांता यांचे पती आणि पीयूष गोयल यांचे वडील सुद्धा भाजपचे नेते होते. दिवंगत वेद प्रकाश गोयल भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. वाजजपेयी यांच्या काळात ते केंद्रीय जहाजराणी मंत्री सुद्धा होते.

0