आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Piyush Goyal, Sanjay Raut, Praful Patel To Return To Rajya Sabha; Opportunity For Sambhaji Raje, Voting On June 10 For 6 Seats, But Likely To Be Unopposed

राज्यसभा निवडणूक:पीयूष गोयल, संजय राऊत, प्रफुल्ल पटेल पुन्हा राज्यसभेवर जाणार; संभाजीराजेंना संधी, 6 जागांसाठी 10 जूनला मतदान

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील विधानसभेतील संख्याबळ पाहता महाराष्ट्रातील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या सहा जागांपैकी भाजपला २ जागा तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी १ खासदार निवडून येणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सर्वसहमतीचे उमेदवार म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून जात आहेत. शिवाय त्यांची २० हून अधिक मते शिल्लक राहत आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी १ उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाईल, अशी सध्याची स्थिती आहे. राष्ट्रपती कोट्यातील खासदारकी भूषवल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र राज्याच्या कोट्यातून राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने त्यांनी सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांसोबत चाचपणी केली असून, त्यांच्या नावाला सर्वांनी सहमती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. महाविकास आघाडीनेही पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत स्पष्ट सूतोवाच केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचीसुद्धा संभाजीराजेंना पाठिंबा देण्यास हरकत नसणार आहे.

संभाजीराजेंना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये मोठी भूमिका पार पाडली होती. त्यामुळे संभाजीराजेंचे भाजप नेत्यांशी सौहार्दाचे संबंध आहेत. दुसरीकडे, भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी आणि महाविकास आघाडीला चौथी जागा जिंकण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने संभाजीराजे हे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सर्वसहमतीचे व सर्वपक्षीय उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.

राज्यसभेत आता भाजपचे संख्याबळ १०० पार करणार नवी दिल्ली| राज्यसभेतील ५७ जागांवर नवे चेहरे येण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. सभागृहातून निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम निश्चित झाला आहे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी होणाऱ्या राज्यसभेच्या या निवडणुकीस माेदींच्या उर्वरित कार्यकाळासाठी महत्त्वाचे मानले जाते. या निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतिपदावर कोण आसनस्थ होणार हेदेखील स्पष्ट होणार आहे. राज्यसभेच्या सभापतिपदाची जबाबदारीही उपराष्ट्रपतींकडे असते. राज्यसभेतील सर्वाधिक ११ जागा उत्तर प्रदेशातील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात विजय मिळवला होता. तामिळनाडूतून ६, पंजाबमधून ३ सदस्य निवडून येतील. पंजाबमधून आम आदमीला शक्ती मिळेल. तामिळनाडूतून द्रमुकला राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल.

निवडणुकीचा कार्यक्रम - २४ मे - निवडणूक अधिसूचना जारी - ३१ मे- अर्ज करण्याची अंतिम तारीख - १ जून- अर्जांची छाननी - ३ जूनपर्यंत - अर्ज मागे घेता येणार - १० जून - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान - १० जून- सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी निकाल

असे आहे समीकरण २८८ च्या विधानसभेत भाजपकडे अपक्ष आमदारांसह ११० आमदारांचे संख्याबळ आहे. तर शिवसेना (५५), राष्ट्रवादी (५३) आणि काँग्रेसकडे (४४) आमदारांचे संख्याबळ आहे. छोटे पक्ष व अपक्षांच्या साथीने आघाडीचे १७० संख्याबळ आहे, तर भाजपचे १०५ अन् अपक्ष ११० पेक्षा अधिक संख्याबळ आहे.

४२ मतांचा कोटा उमेदवार निवडून येण्यासाठी यंदा प्रत्येकी ४२ मतांचा कोटा असणार आहे. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून जाऊनसुद्धा आघाडीकडे २५ हून अधिक मते अतिरिक्त राहत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीकडे प्रत्येकी २० पेक्षा अधिक मते शिल्लक राहतात.

संभाजीराजे सहावे सदस्य आघाडी अन् भाजप दोघांचाही चौथा उमेदवार निवडून येईल इतके संख्याबळ नाही. त्यामुळे सहाव्या जागेसाठी सर्वसहमतीचा उमेदवार दिला जाणार हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नावावर सर्वसहमतीचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

यांची शक्यता : भाजपकडून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि डॉ. विनय सहस्रबुद्धे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता. - शिवसेनेकडून खासदार व प्रवक्ते संजय राऊत - राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित मानले जाते. - काँग्रेसकडून पी.चिदंबरम यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी.

बातम्या आणखी आहेत...