आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयपीएल 2020:बायाे-सिक्याेरमध्ये खेळाडू करतील सराव; आयपीएलचे वेळापत्रक आठवडाभरात जाहीर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिकृत यजमानपदाचे लेखी पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यूएईला दिले

यंदाच्या सत्रातील आयपीएलचे अधिकृत असे यजमानपद आता यूएईला मिळाले आहे. यासाठीचे लेखी स्वरूपातील पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयाेजकांकडे साेपवले. आम्ही यूएईत आयपीएलचे आयाेजन करत असल्याची अधिकृत घाेषणाही गव्हर्निंग काैन्सिलचे चेअरमन बृजेश पटेल यांनी रविवारी केली. आता बायाे-सिक्याेरच्या वातावरणात सर्व सहभागी खेळाडू सराव करतील. तसेच आठवडाभरात या लीगचे वेळापत्रक जाहीर हाेईल.

या १३ व्या सत्राच्या आयपीएलचे यजमानपद यूएई भूषवणार आहे. त्यामुळे याठिकाणी लीगसाठी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यूएईने आपल्या देशांतर्गत लीगसाठी तयार केलेला प्राेटाेकाॅल आता या आयपीएलमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याच नियमानुसार लीगच्या आयाेजनाचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती एमिरात क्रिकेट मंडळाचे (ईसीबी) सचिव उस्मानी यांनी दिली. यूएईमध्ये डी-१० लीग स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. या लीगच्या आयाेजनातून आयाेजकांना अनुभव मिळाला. याच अनुभवाच्या बळावर आयपीएलचे आयाेजन यशस्वीपणे करण्यात येईल.

इंग्लंड-ऑस्ट्रेलियन खेळाडूंना प्रवेश अडचणीत!
इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या आठवड्यानंतर आपापल्या फ्रँचायझी सोबत जोडले जातील. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोघांत तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना १६ सप्टेंबर रोजी मँचेस्टरमध्ये होईल. आयपीएल १९ सप्टेंबर रोजी यूएई होणार आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघांाच्या खेळाडूंना १६ रोजी पुन्हा लंडन येथून दुबईला रवाना व्हावे लागणार आहे.