आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंची सडकून टीका:सण - उत्सवाच्या वेळेस राजकारण करणं हा बालिशपणा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सण-उत्सवाच्या वेळेस राजकारण करणे हे बालिशपणा आहे, असे म्हणत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

आदित्य यांनी शुक्रवारी दक्षिण मुंबईतील कुलब्याचा युवराज, फोर्टचा इच्छापूर्ती, अखिल चंदनवाडी, गिरगावचा महाराजाचं दर्शन घेतले.

दरम्यान, 'कुलब्याचा युवराज' बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या राजकारणावर सडकून टीका केली.

लोकांना आनंद घेऊ द्या

शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिने पूर्ण झाले असून त्यांना तुम्ही किती गुण द्याल?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, मी उत्सवाच्या दिवशी मी राजकारणावर बोलत नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे यावर मी काहीही बोलणार नाही. उत्सवाच्या काळात जो कुणी राजकारण करत असेल तो बालिशपणा आहे. लोकांना हे सगळे दिसत आहे. एवढे राजकारण झाले तर लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर आता सणवारांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन लोकांना याचा आनंद घेऊ द्यावा.

हात उचलणे अयोग्य

आदित्य ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला केल्या मारहाणीवर देखील भाष्य केले. हा घाणेरडा प्रकार होता. मी पाहिले, अगदी राग येण्यासारखा तो प्रकार आहे. कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता असो मात्र असे करणे योग्य नाही. कडक कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई लोकांना दिसली पाहिजे. महिलेवर हात उचलला हे योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

काँग्रेसचे नऊ आमदार फुटणार ?

शिवसेनेनंतर आता काँग्रेसचेही 9 आमदार फुटणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर पत्रकारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आदित्य म्हणाले की, जाऊ दे ना, आपण आत्ता जर-तर, अगर-मगरपेक्षा देवाचे दर्शन घेऊ आणि त्या आशीर्वादाने पुढे जाऊ.

बातम्या आणखी आहेत...