आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेसळ करणाऱ्यांवर कारवाई:संकटाच्या काळात मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, दुधात भेसळ करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई गुन्हे शाखेने अंधेरीच्या वर्सोवा भागात छापा टाकत भेसळयुक्त दूध विकणाऱ्या दोघांना केली अटक

मुंबई गुन्हे शाखेने अंधेरीच्या वर्सोवा भागात छापा टाकत भेसळयुक्त दूध विकणाऱ्या दोघांना अटक केली आहे. सुप्रसिद्ध कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमधून दूध काढून टाकल्यानंतर, तेवढेच पाणी मिसळून विक्री करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर गुन्हे शाखेने याठिकाणी छापा टाकून दोघांना अटक केली आहे. या छाप्यात सुमारे २९४ लिटर भेसळयुक्त दूधही जप्त केले आहे.

अमूल, गोकूळ, मदर डेअरी सारख्या नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व आपला खिसा भरणाऱ्या दोघांचा गोरखधंदा गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. या कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमधून दूध काढून टाकल्यानंतर, त्यात खराब पाणी मिसळले जात होते नंतर लाइटर व मेणबत्ती आणि स्टोव्ह पिनने पुन्हा दुधाची पिशवी सिल केली जात होती..लगेच सिल केल्यामुळे हे भेसळयुक्त दूध आहे हे कळत नाही.

गोकुळ व अमूल सारख्या नामचीन कंपन्यांच्या पिशव्यांमधून दूध काढून पाणी भरण्याची प्रक्रिया बर्‍याच काळापासून सुरू होती. मुख्य म्हणजे या अगोदर याच भागात असा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला होता.

बातम्या आणखी आहेत...