आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांसोबत व्हीसी:लॉकडाऊन कायम ठेवा, निर्बंध शिथिल करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांना पीक कर्ज, जीएसटी परताव्याचीही केली मागणी

जून-जुलै महिन्यात कोरोनाचा कहर शिखरावर जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन उठवला जाऊ नये. लॉकडाऊन न उठवता निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.     

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात सोमवारी  विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.   या वेळी राज्याची भूमिका मांडताना मुख्यमंत्री  ठाकरे यांनी लॉकडाऊनसोबतच शेतकरी, जीएसटी, पोलिसांवर पडणारा ताण आदी महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. 

ते म्हणाले की, एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला, परंतु आता जून-जुलै महिन्यात कोराेना कहर उच्चांक गाठू शकतो असे सांगितले जात आहे. चीनच्या वुहान शहरातही पुन्हा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही इशारा दिला आहे. लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, असे त्यांनी सांगितले. मुंबई-पुण्यासारखा तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स देशाच्या पातळीवर तयार करून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तो संपर्कात राहील असे पाहण्याची सूचना या वेळी  मुख्यमंत्र्यांनी केली. 

रिझर्व्ह बँकेला सूचना कराव्यात 

कोरोनापूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरू होती. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सूचना द्याव्यात, सुमारे १० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल,असे ठाकरे म्हणाले.

प्रमुख मागण्या : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेला सूचना द्याव्यात 

- कोराेनामुळे ३५ हजार कोटींचा फटका,जीएसटी-केंद्रीय करापोटीचा परतावा लवकर द्यावा   - पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राने मनुष्यबळ पुरवावे   

- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करा  

- वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करावे   

- आयात वैद्यकीय उपकरणांवर सीमा शुल्कात सवलत द्यावी

बातम्या आणखी आहेत...