आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींची आज 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि केरळ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. बैठकीदरम्यान, आपल्याला चाचणी, ट्रॅक, उपचार आणि लसीकरणावर विशेष लक्ष द्यावे लागेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या राज्यांत कोरोनाचे नवीन प्रकरणे वाढत आहे. तेथे सक्रिय उपायोजना करत कोरोनाची संभाव्य तिसरी रोखणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, बऱ्याच दिवस कोरोनाचे प्रकरणे वाढत राहिल्यास व्हायरसमध्ये म्यूटेशनची शक्यता वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे आणखी नवीन धोका निर्माण होऊ शकतो. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कडक उपायोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्याने जे काम केले तेच आपल्याला करायचे आहे. त्यासाठी टेस्टेड अँड प्रूव्हन मेथर्ड वापरावी लागेल असे ते म्हणाले.
जेथे प्रकरणे अधिक तेथे लक्षदेखील अधिक द्यावे
राज्यात ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आहे तेथे मायक्रो कंटेनमेंट झोन वेगाने तयार करावे लागेल. त्यासोबत अशा ठिकाणी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जेंव्हा मी ईशान्य राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत बोलत होतो तेंव्हा त्यांनी आपल्या राज्यात लॉकडाऊन न करता मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले.
कोविड फंडचा वापर करत आरोग्य सुविधा वाढवा
राज्यातील ऑक्सिजन बेड, चाचणी, लसीकरण आणि इतर अत्यावश्यक सुविधा वाढवण्यासाठी केंद्राकडून राज्यांना फंड उपलब्ध करुन दिले आहेत. नुकतेच केंद्र सरकारने 23 हजार कोटी रुपयांची आपत्कालिन मदत जाहीर केली असल्याचे ते यावेळी म्हणाले. याचा उपयोग राज्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी केला जावा. त्यासोबतच ग्रामीण भागात अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे. आयटी क्षेत्रात कॉल सेंटरसारख्या सुविधेला बळकटी देणे गरजेचे आहे कारण यामुळे डेटा ट्रेकिंग करणे सोपे जाणार आहे.
चार दिवसात दुसरी बैठक
पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहे. गेल्या 4 दिवसातील ही त्यांची दुसरी बैठक आहे. यापूर्वी त्यांनी ईशान्य भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. बैठकीदरम्यान, त्यांनी राज्यांतील कोरोना परिस्थितीचा विस्तृतपणे आढावा घेतला आणि कडक पाऊल उचलण्याचे निर्देश दिले होते.
देशात गेल्या 24 तासांत आढळले 39,071 नवे रुग्ण
देशातील कोरोनाचे नवीन प्रकरणे आणि सक्रिय रुग्ण संख्या जवळपास स्थिर आहे. म्हणजेच जेवढे नवीन प्रकरणे येत आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त रुग्ण उपचार घेत बरे होत आहे. गेल्या 24 तासात म्हणजे गुरुवारी 39 हजार 71 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, यात 39 हजार 827 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर 544 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
एका दिवसातील मृतांचा आकडा गेल्या 101 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 5 एप्रिल रोजी 446 लोकांचा मृत्यू झाला होता. देशातील सक्रिय रुग्ण संख्यादेखील कमी जास्त होत आहे. बुधवारी यामध्ये 1 हजार 874 ने वाढ झाली तर गुरुवारी 1 हजार 316 ने घट पाहायला मिळाली. देशात सध्या 4 लाख 24 हजार लोकांवर उपचार सुरु आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.