आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थी:गणपती बाप्पा मोरया… राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाचे नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, सर्वच गणेश मंडाळांना कोरोना नियमांचे पालन करत गणेश विसर्जन करण्याचे निर्देश देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करत गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत, रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत लिहिले की, ‘गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना शुभेच्छा. माझी इच्छा आहे की, विघ्नहर्ता गणेश कोरोनाविरूद्ध आमचे प्रयत्न यशस्वी करत सर्वांना आनंद आणि शांतीचा आशीर्वाद लाभो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर लोकांना मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या सोशल हँडलवरुन लिहिले की, "आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!" असे ट्विट करत पंतप्रधानांनी मराठी वासियांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून अभिनंदन केले. त्यांनी लिहिले की, ‘सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.’ आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.

मुंबई, पुण्यात कलम 144 लागू
पुढील 10 दिवस सुरू राहणारा गणेशोत्सव पाहता मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी 5 हून अधिक लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्व प्रमुख शहरांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून मुंबईकरांना साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. नगराळे म्हणाले, ' गणपतींच्या पंडालमध्ये कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या 5 लोकांना पूजा-अर्चासाठी आणि गणपती विसर्जनदरम्यान 10 लोकांना जाण्याचू सूट देण्यात आली आहे. पोलिस साध्या गणवेश आणि गणवेशात पूजा पंडाल, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी आणि इतर ठिकाणी सज्ज असतील. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग किंवा कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल कलम 188 (महामारी कायदा) अंतर्गत दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.

मुंबईत 35 हजार पोलिस तैनात
सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे गणेश पंडालवर लक्ष ठेवले जात आहे जेणेकरून नियमांचे पालन केले जाईल. याशिवाय डॉग स्क्वॉड, बीडीडीएस, क्यूआरटी इत्यादींना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. 35 हजारांहून अधिक पोलिस सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आले आहेत, तर 3 ते 4 हजार अतिरिक्त पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या वतीने, सर्व क्षेत्र, झोन, पोलिस स्टेशन आणि सुरक्षा यंत्रणेशी संबंधित सर्व एजन्सींशी बोलल्यानंतर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...