आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) PMC बँक घोटाळ्यातील तपासाची व्याप्ती वाढवत शिवसेनेचे माजी खासदाराविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. या खासदाराच्या खात्यात कित्येक कोटी रुपये थेट हस्तांतरित झाल्याचे तपासात समोर आले आहे. ईडी त्यांना लवकरच समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार आहे. दरम्यान सोमवारी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सुमारे साडेतीन तास चौकशी केली.
EDच्या सूत्रांनुसार प्रवीण राऊत यांच्या एका कंपनीद्वारे एका संस्थेत कोट्यवधी रूपये ट्रान्सफर केले होते. हे ट्रस्ट एका सुप्रसिद्ध राजकीय कुटुंबाद्वारे नियंत्रित केले जातो. या घोटाळ्यात अंडरवर्ल्डची भूमिका असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे.
एका मोठ्या ट्रस्टला कोट्यवधी रुपयांच्या हस्तांतरणाचे पुरावे मिळाले
एचडीआयएलच्या प्रवर्तक वर्धवान बंधूंनी PMC बँकेकडून घेतलेल्या रकमेचा हा भाग असल्याचे म्हटले जाते. ईडीने आतापर्यंत वर्धवान बंधूंची 1100 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. यामध्ये जमीन, बंगले, फ्लॅट्स आणि इतर मालमत्तेचा समावेश आहे.
वर्षा राऊत यांची चार तास चौकशी
याच प्रकरणात सोमवारी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.
संशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या होत्या. दोन वेळा तब्येतीचे कारण देत त्यांनी चौकशी टाळली. परंतु, सोमवारी त्या चौकशीसाठी बलार्ड पीयर येथील कार्यालयात हजर झाल्या होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.