आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या पत्नी वर्षा आजही अंमलबजावणी संचालनालय (ED) समोर हजर होणार नाहीत. त्यांना तिसऱ्यांचा समन्स पाठवण्यात आलेला होता. यापूर्वी दोन वेळाही त्या ईडीसमोर हजर झालेल्या नव्हत्या. पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडीला वर्षा यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या 55 लाख रुपयांच्या ट्रांजेक्शनविषयी विचारायचे आहे.
ईडीकडून विचारले जाऊ शकतात हे प्रश्न
काय आहे प्रकरण
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात प्रवीणच्या खात्यातून मोठी रक्कम आली होती. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वर्षा यांच्या खात्यात कर्जासाठी काही रक्कम घेतल्याचे नमूद केेले आहे. हा व्यवहार ईडीला जाणून घ्यायचा आहे.
महाविकास आघाडीकडून टीका
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस धाडली आहे. नोटीसनुसार 29 डिसेंबरला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. केंद्र सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.