आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी डॉमेनिकात जेरबंद:मेहुल चोकसीला अखेर अटक; भारतात प्रत्यार्पणाची शक्यता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी मेहुल चोकसी अँटिग्वातून बेपत्ता झाला होता.

अँटिग्वाच्या शेल्टरमधून बेपत्ता झालेला पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला डॉमेनिका देशात अटक करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, तो भारतात प्रत्यार्पणाच्या भीतीने क्युबाहून फरार होण्याच्या तयारीत होता. क्युबासाेबत भारताचा प्रत्यार्पण करार नाही. रविवारी मेहुल चोकसी अँटिग्वातून बेपत्ता झाला होता. यानंतर इंटरपोलने यलो नोटीस जारी केली होती. अँटिग्वा पोलिसही त्याचा कसून शोध घेत होते. डॉमेनिका पोलिस त्याला लवकरच अँटिग्वाकडे सोपवणार आहेत.

नुकतेच बारबुडाचे पंतप्रधान पीएम गॅस्टन ब्राऊन म्हणाले होते, आम्ही चोकसीला आपल्या देशाबाहेर करू पाहत आहोत. त्याचे लवकरात लवकर भारताकडे प्रत्यार्पण करण्याची आमची इच्छा आहे. आमच्यासाठी त्याची काही किंमत नाही. २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्यापूर्वी चोकसीने कॅरेबियन देश अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले होते. तेव्हापासून तो तेथेच राहत होता.

बातम्या आणखी आहेत...