आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतल्या वांगणी स्टेशनवर घडला थरार:जिवाची बाजी लावत पॉइंटमनने चिमुकल्यास वाचवले; रेल्वेमंत्र्यांनी फोन करून केले कौतुक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे सोमवारी मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पाॅइंटमनचा सत्कार केला.

तोल जाऊन सहा वर्षांचा चिमुकला रुळावर पडला, इतक्यात पुण्याकडून उद्यान एक्स्प्रेस येत होती. शेजारी काम करणाऱ्या रेल्वेच्या पाॅइंटमनने प्रसंगावधान दाखवत ६० मीटर अंतर पळत जाऊन चिमुकल्याला फलाटावर टाकले व गाडीचे इंजिन पोचण्यापूर्वी स्वत: फलाटावर चढला. या धाडसाबद्दल छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मुख्य कार्यालयात पाॅइंटमन मयूर शेळकेला बोलावून मध्य रेल्वेने त्याचा सत्कार केला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही फोन करून त्याचे कौतुक केले.

मध्य रेल्वेवर नेरळ आणि बदलापूरच्या मध्ये वांगणी हे उपनगरीय गाड्या थांबण्याचे स्टेशन आहे. शनिवारी सायंकाळी अंध महिला तिच्या चिमुकल्याला घेऊन फलाटावरून जात होती. चिमुकला तिच्या डाव्या बाजूने चालत होता. तो अचानक आईच्या उजव्या बाजूला आला अन् फलाटावरून रुळावर पडला. महिला अंध असल्याने चिमुकल्यास तिला हात देणे शक्य नव्हते. ती केवळ ओरडत होती. चिमुकला फलाटावर चढण्याचा प्रयत्न करत होता, पण फलाट उंच असल्याने त्याचा प्रयत्न अयशस्वी होत होता. फलाटावर संचारबंदीमुळे गर्दी नव्हती. इतक्यात पुण्याहून उद्यान एक्स्प्रेस धडधडत त्याच फलाटावर आली. रुळाच्या पलीकडे मयूर शेळके हा पाॅइंटमन ५० मीटर अंतरावर काम करत होता.

त्याने पाहिले आणि तत्काळ धाव घेतली. समोरून उद्यान एक्स्प्रेस येतच होती. मयूरने काही सेकंदांत अंतर तोडले. पहिल्यांदा चिमुकल्यास फलाटावर टाकले अन् स्वत: फलाटावर सुरक्षित चढला. मयूर फलाटावर चढताच अगदी ७ सेकंदांत तेथे उद्यान एक्स्प्रेस पोचली. हा सर्व थरारक प्रकार स्टेशनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...