आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोजच्या दैनंदिन जीवनात लहान मुलांच्या मृत्यूच्या बातम्या वाचायला मिळतात. जास्त करून मुलांना शाळेत भेसळयुक्त जेवण दिल्याने त्यांच्य़ा मृत्यूच्या संख्येचे प्रमाण वाढले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार भिवंडी येथील दाभाड भागातील एका आश्रम शाळेमधील ज्योत्स्ना सांबर (9) हिला उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने ह्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ज्योत्स्ना असे मृ़त झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान ज्योत्स्नाच्या मृत्यूनंतर आणखी 16 विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचा त्रास जाणवला आहे. परंतु यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास का झाला याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. या प्रकरणावरून संपुर्ण आश्रमात खळबळ उडाली आहे. परंतु अन्नातून किंवा पाण्यातून त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज डॉक्टरांकडून वर्तविला जात आहे. घटनेनंतर आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने आश्रमशाळेतील अन्नाचे आणि पाणाचे नमुने गोळा केले आहेत.
दाभाड येथील शिरोळे गावात हे आश्रम आहे. सुमारे 300 विद्यार्थी या आश्रमशाळेत राहतात. बुधवारी रात्री आश्रमातील ज्योत्स्ना हिला अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. आश्रम शाळेतील शिक्षकांनी तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला डॉक्टरांनी तात्काळ भिवंडी येथील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तिचा जागीच मृत्यू झाला होता. गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी आणखी 16 विद्यार्थ्यांना अशाचप्रकारचा त्रास झाला. त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान यातील 17 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर दाभाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकाने आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. तर अन्न व औषध प्रशासनाने येथील अन्नाचे आणि पाण्याचे नमुने गोळा केले आहेत. विषबाधेतून हा प्रकार झाला असावा असा अंदाज डॉक्टरांकडून वर्तविला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.