आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्याचा शिवसैनिक गुवाहाटी पोलिसांच्या ताब्यात:संजय भोसले थेट रेडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर धडकले, हातात 'शिंदे परत चला'चे फलक

गुवाहाटी/ सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंडखोर एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना परत शिवसेनेत येण्याचे आवाहन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील बिजवडीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले हे थेट गुवाहाटीत पोहचले आहेत. 'एकनाथ शिंदे 'मातोश्री' वर परत चला' चा फलक हातात घेऊन हॉटेल रेदिसन ब्लू बाहेर उभे होते. पण, हॉटेल बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याने गुवाहाटी पोलिसांनी संजय भोसले यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नियमानुसार केल्याचे म्हटले आहे.

संजय भोसले यांनी एकनाथ शिंदेंना आर्त साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या हातात "शिवनसेना जिंदाबाद! एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उद्धवजी आणि आदित्यजींना साथ द्या" असा मजकूर लिहलेला फलक घेतला होता. या माध्यमातून त्यांनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेत परत येण्याचे भावनिक आवाहन केले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेच्या तब्बल 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंना समर्थन देणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे.

मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक

शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवर राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुख आणि तालुका शाखा प्रमुखांची बैठक घेणार आहेत. तर संध्याकाळी 7 वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्याच्या राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. या घडामोडी कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचतात याबाबत मात्र प्रचंड उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...