आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी जबाब नोंदवला आहे. त्यांनी आपल्या जबाबात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला असून कोरेगाव -भीमा हिंसाचारावेळी पोलिसांनी योग्यवेळी कारवाई न करता दुर्लक्ष केले त्यामुळे हिंसाचार भडकला असा दावा त्यांनी केला आहे.
पोलिसांनी योग्यवेळी काळजी घ्यायला हवी होती, असेही पवारांनी स्पष्ट केले. हिंसाचाराच्या घटनेबाबत आपल्या माध्यमांतून समजल्याचे सांगत पवारांनी कुणावरही वैयक्तिक किंवा राजकीय आरोप मला करायचे नाहीत, असेही ते म्हणाले.
संभाजी भिडे, एकबोटेंना ओळखत नाही
संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना मी व्यक्तिश: ओळखत नाही. जे काही घडले ते दुर्दैवी होते. अशी स्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी यंत्रणेची होती. त्यांनी कुचराई केली असून वेळीच हे थांबवता आले असते पण थांबवले गेले नाही असा आरोपही त्यांनी केला. मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे वकील नितीन प्रधान यांनीही पवारांना प्रश्न विचारले.
एकबोटेंचे वकील प्रधान यांचे पवारांना प्रश्न :
प्रश्न : तुमच्या प्रतिज्ञापत्रात तुम्ही म्हटले की, तुम्हाला या घटनेबद्दल काहीही माहिती नाही, तुमची माहिती ही मीडियात आलेल्या बातमीवर अवलंबून आहे.
उत्तर : होय, मीडियातून काही गोष्टी समोर आल्या होत्या. 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली. त्यानंतर 1 जानेवारी 2018 मध्ये ही घटना घडली.
प्रश्न : शिक्रापूर, पिंपरी पोलिस ठाण्यात काही गुन्हे नोंदवले, याची तुम्हाला काही माहिती नव्हती का?
उत्तर : होय, मला काही माहिती नव्हती. मीडियातून मला समजले.
प्रश्न : तुम्हाला कुणावरही वैयक्तिक किंवा राजकीय आरोप करायचे नाहीत हे खरे आहे का?
उत्तर : होय, हे खरे आहे.
प्रश्न : तुमच्या मते राजद्रोहाचे आयपीसी कलम 124 A हे काढून टाकावे किंवा सुधारावे?
उत्तर : होय हे बरोबर आहे
प्रश्न : राईट विंगची व्याख्या काय आहे?
उत्तर : राईट विंग म्हणजे या विचारांचे लोक सर्व सामान्य जनमानसात समज आणि वस्तुस्थिती अशी आहे की, समाजात धर्म, जातींमध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. लेफ्ट विंग ही एक विचारधारा आहे.
प्रश्न : भिडे, एकबोटेंना कधी भेटलो नाही! शरद पवारांचं उलटतपासणीत उत्तर
उत्तर : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना मी व्यक्तीशः ओळखत नाही.
प्रश्न : कोरेगाव भीमा दंगलीला तत्कालीन राज्य सरकार जबाबदार होते का?
उत्तर : जे काही घडले ते दुर्दैवी. अशी स्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी यंत्रणेची होती. त्यांनी कुचराई केली. वेळीच हे थांबवता आले असते पण थांबवले नाही. पोलिस कायदा आणि सुव्यवस्था यासाठी जबाबदार असतात. पोलिसांची जबाबदारी होती, योग्य वेळी काळजी घ्यायला हवी होती. पण त्यांनी योग्यवेळी कारवाई न करता दुर्लक्ष केले.
प्रश्न : अशाप्रसंगी पोलिसांना अहवाल देणे गृहखात्याला बंधनकारक असते का?
उत्तर : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठंही निर्माण झाला तर त्याचा अहवाल डीसीपी हा अहवाल पाठवतात.
प्रश्न : राईट विंग संघटना एल्गार विरोधात पत्रकार परिषद घेत होते याची माहिती आहे का?
उत्तर : याबाबत मीडियातून ऐकण्यास येत होते.
प्रश्न : एक जानेवारी काळा दिवस पाळावा, असे मेसेज सोशल मीडिया मधून फिरत होते याबाबत माहिती आहे का?
उत्तर : मला माहीत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.