आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर देशभरात काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. गुरुवारी महाराष्ट्र काँग्रेसने राजभवनावर मोर्चा काढला होता, मात्र पोलिसांनी त्यांना ५०० मीटर अलीकडेच रोखले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी काही काळासाठी ताब्यातही घेतले होते.
‘आम्ही राज्यपालांना निवेदन देण्यासाठी जात होतो, असे काँग्रेसने म्हटले.’ मात्र, काँग्रेस पदाधिकारी आलेच नाहीत, असे राजभवनातर्फे सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांनी राजभवन परिसराला बॅरिकेडिंग केली असून राजभवनाची सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गेल्या दोन दिवसांपासून ईडी चौकशी करत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ईडी आणि भाजपचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनाची हाक दिली आहे. संतप्त आंदोलकांनी ‘मैं भी राहुल’ असे फलक हातात घेतले आहेत. काँग्रेसच्या या मोर्चात मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
आता सोमवारी चौकशी
काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात ईडीसमोर हजर राहण्यासाठी मागितलेली तीन दिवसांची सवलत ईडीने मंजूर केली आहे. राहुल यांची आता सोमवारी चौकशी होईल. राहुल यांनी त्यांची आई साेनिया गांधी यांच्या प्रकृतीचे कारण सांगून शुक्रवारऐवजी साेमवारी हजर राहण्याची परवानगी मागितली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.