आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीन मिळाला तरी दिलासा नाहीच:नाशकात 2 सप्टेंबरला पोलिस स्टेशनमध्ये लावावी लागणार हजेरी, जन आशीर्वाद यात्रा स्थगित; आजच हायकोर्टात धाव घेऊ शकतात राणे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यायालयाने राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर नारायण राणे यांना मंगळवारी नाशिक पोलिसांनी अटक केली नंतर जामिनावर सुटका त्यांचीही सुटकाही करण्यात आली. मात्र तरी देखील राणेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता नाशिक पोलिसांनी आपल्याकडे दाखल एका केसमध्ये नारायण राणेंना नोटीस पाठवून त्यांना 2 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.

राणेंविरोधात पहिला गुन्हा नाशिकमध्येच नोंदवण्यात आला होता आणि त्यांच्याविरुद्ध येथून वॉरंटही जारी करण्यात आले होते. दरम्यान, राणेंची जन आशीर्वाद यात्रा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. राणे हे त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले 4 खटले रद्द करण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु शकतात.

राणे यांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक केली होती. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देत हल्ला केला. या हल्ल्यात काही शिवसैनिक जखमी झाले. आता पोलिसांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी 100 हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाने राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला
जामीन मंजूर करताना महाड कोर्टाने राणेंना 15,000 रुपयांचे बॉण्ड सादर करण्यास सांगितले होते. नाशिक पोलिसांना राणेंच्या ऑडिओला मुख्यमंत्र्यांसाठी दिलेल्या वक्तव्याशी जुळवायचे आहे, म्हणून राणेंना 2 सप्टेंबर रोजी नाशिकला बोलावण्यात आले आहे. राणे यांना 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी रायगड गुन्हे शाखेपुढे देखील हजर व्हायचे आहे. जामीन देताना न्यायालयाने राणे यांना कागदपत्रे आणि पुराव्यांशी छेडछाड करू शकत नाही, अशा सक्त सूचना दिल्या.

राणे आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात
नारायण राणे हे आज त्यांच्याविरोधात नाशिक, पुणे, रायगड आणि जळगाव येथे दाखल केलेले खटले रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करु शकतात. काही वेळापूर्वी वकिलांचे एक पथक नारायण राणे यांच्या घराबाहेर दिसली आहे. या संदर्भात आवश्यक कागदपत्रे आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वकील अनिकेत निकम यांचे एक पथक येथे आले.

बातम्या आणखी आहेत...