आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवली, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षाही मूळ मुद्दा महत्त्वाचा : राज ठाकरे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसे कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी पवारांना भेटणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या राजीनाम्याचा विषय महत्त्वाचा नाही. त्यापेक्षाही उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली असा सवाल करुन कोणी तरी सांगितल्याशिवाय पोलिस अशा प्रकारचे कृत्य करणार नाहीत. या घटनेचीही चौकशी झाली पाहिजे,अशी जोरदार मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाणे येथील पदाधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ता जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवकावर आरोप केले. तसेच याप्रकरणी आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे राज यांनी सांगितले. संशयित नगरसेवक नजीब मुल्ला हा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता आहे.

२३ नोव्हेंबर २०२० रोजी ठाण्यातील राबोडी भागात जमील शेखची दिवसाढवळ्या डोक्यात गोळी घालून हत्या झाली होती. शेख ठाण्यामधील भ्रष्टाचार व अनधिकृत बांधकामांचे प्रकरण उघडकीस आणण्याचे काम करत होता. त्याच रागातून त्यांची हत्या झाली असावी असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ज्या चार नगरसेवकांची नावे डायरीत सापडली होती. त्यापैकी नजीब मुल्ला हा देखील होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो काही काळ जेलमध्ये देखील होता, असे राज यांनी सांगतिले.

परप्रांतीयांमुळे कोरोना वाढतोय
महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. पश्चिम बंगाल व इतर राज्यांमध्ये आपण कोरोनाचा लाटा आल्याचे ऐकायला येत नाही कारण त्या राज्यात कोरोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे बाहेर येत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...