आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:डान्सबारवर पोलिसांचा छापा, पैसे उधळत अश्लील कृत्य करणाऱ्या 15 ग्राहकांना अटक; 11 बारबालांची केली सुटका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी छापा टाकला तेव्हा लोक बार बालांवर पैसे उधळत होते

मुंबई पोलिसांनी अर्ध्या रात्री गोरेगावमध्ये सुरू असलेल्या एका डान्स बारवर छापा मारत 15 ग्राहकांसह 20 लोकांना अटक केली. गोरेगाव येथील स्टार बारमध्ये ही कारवाई करण्यात आली. छापा मारला तेव्हा 11 बारबाला डान्स फ्लोअरवर नाचत होत्या. सर्वांना बारमधून वाचवण्यात आले आणि शनिवारी सकाळी सोडले. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा लोक मुलींवर पैसे उधळत होते. अनेक जण अश्लील कृत्य करताना पकडले.

गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्टार बारचे वेटर, बारचे पर्यवेक्षक, रोखपाल व व्यवस्थापक यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, 15 ग्राहकांना महामारी कायद्याचा भंग आणि अश्लीलता पसरवल्याबद्दल अटक करण्यात आली.सध्या या प्रकरणात कारवाई सुरू असून पोलिस गोरेगाव पोलिस ठाण्यात सर्वांची विचारपूस करत आहेत.

जवळपास सर्व आरोपी मद्यधुंद अवस्थेत आढळले .
जवळपास सर्व आरोपी मद्यधुंद अवस्थेत आढळले .

राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन

डीसीपी विशाल ठाकुर यांनी सांगितले की, राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाउन कायम आहे. 5 ऑक्टोबरपासून हॉटेल आणि बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे मात्र बारमध्ये कोणत्याही डान्सवर बंदी आहे. अशात हे लोक अवैधरित्या बार चालवत होते. बारमध्ये कुठेतरी ड्रग्स पार्टी चालू होती की नाही याचा तपासही आता पोलिस करीत आहेत. पकडलेले बरेच ग्राहक मोठ्या कुटुंबातील आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser