आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा हत्याकांड:पोलिसांनी नोंदवले सहा जणांचे जबाब, सोसायटी सचिवांकडे केली आफताबविषयी चौकशी

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईतील मीरा रोड परिसरात दिल्ली पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. दिल्ली पोलिसांनी माणिकपूर पोलिस ठाण्यातील पथकाच्या मदतीने याप्रकरणी तपास चालवला असून त्यांनी अाफताब पूनावाला याला मदत करणाऱ्या एका व्यक्तीची कसून झडती घेतली.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व वसईतील एका फ्लॅटमध्ये श्रद्धा आणि आफताब एकत्र राहत होते. नंतर ते दिल्लीला स्थलांतरित झाले. या संदर्भाने पोलिसांनी घरगुती सामान स्थलांतरित करणाऱ्या गोविंद यादवची चौकशी केली. गोविंदच्या कंपनीने आफताबच्या वसईतील फ्लॅटमधील सामान दिल्लीतील छत्तरपूरमध्ये स्थलांतरित केले होते. हे सामान हलवण्यासाठी त्याने २० हजार रुपये घेतले होते.५ जून २०२२ रोजी समान स्थलांतराची रिसीट पोलिसांना सापडली आहे. या चौकशीदरम्यान गोविंद याने आपण आफताबला व्यक्तिश: ओळखत नसल्याचे सांगितले. आफताबने सामान शिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग केले होते. पोलिसांनी रविवारीच गोविंदचा जबाब नोंदवला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी आफताब राहत असलेल्या युनिक पार्क हाउसिंग सोसायटीचे सचिव अब्दुल्ला खान यांचाही जबाब नोंदवला.

या जबाबात अब्दुल्ला खान यांनी सांगितले की, आफताबच्या कुटुंबाने २० दिवसांपूर्वीच घर रिकामे करून ते भाड्याने दिले होते. आफताबचे कुटुंबीय कुठे राहते, याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचेही अब्दुल्ला खान यांनी सांगितले. त्यांचा मोबाइलही स्विच ऑफ होता, असेही ते म्हणाले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात श्रद्धा आणि आफताबच्या मित्र आणि नातेवाइकांसह अनेकांना बोलावले असून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

आरोपी आफताब हा श्रद्धासोबत मुंबईतील वेगवेगळ्या भागातील केनी अपार्टमेंट, रीगल अपार्टमेंट आणि व्हाइट हिल्स अपार्टमेंटसह तीन अपार्टमेंटमध्ये राहत होता. श्रद्धा हत्या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारपासून महाराष्ट्रातील वसई भागात तळ ठोकून आहे. लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता आणि तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून नवी दिल्लीतील छत्तरपूर परिसरात टाकून दिले होते.

श्रद्धाच्या मित्र-मैत्रिणींनी दिले जबाब शनिवारी पोलिस पथकाने श्रद्धाची जिवलग मैत्रीण शिवानी म्हात्रे आणि श्रद्धाचे माजी व्यवस्थापक करण बेहरी यांचेही जबाब नोंदवले होते. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. फ्लॅटमध्ये श्रद्धा आणि आफताब दिल्लीला जाण्यापूर्वी राहत होते. तेथील श्रद्धाचा जवळचा मित्र लक्ष्मण नाडर आणि राहुल गॉडविन यांचेही जबाब नोंदवले गेले.

बातम्या आणखी आहेत...