आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Police Recruitment, Education Security, Other Important Issues Of The Maratha Community Are Not Readable In The Cabinet Meeting MLA Vinayak Mete

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:पोलिस भरती, शिक्षण सुरक्षितता, यासह मराठा समाजाच्या इतर महत्वाच्या बाबींची मंत्रिमंडळ बैठकीत वाच्याताच नाही - आमदार विनायक मेटे

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने मराठा समाजाच्या अर्धवट मागण्याच पूर्ण केल्या, मेटेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र सरकारने कालच्या कॅबिनेटमध्ये मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले. या निर्णयाबद्दल शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सरकारचे स्वागत केले आहे. त्यासोबतच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय न झाल्याचे त्यांनी सरकार आणि जनतेच्या निदर्शनास आणून दिले आहे.

विनायक मेटे म्हणाले की, 'जो मुळ मुद्दा आहे जसे की विद्यार्थ्यांचा शिक्षणाचे प्रवेश आणि ज्यांनी प्रवेश घेतले त्यांची सुरक्षितता काय? ज्यांनी नोकरी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला, ज्यांनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या त्यांचे पुढे काय? याबद्दल कालच्या कॅबिनेट मध्ये कुठलाच निर्णय झाला नाही.

यासोबतच गृह विभागाने काढलेली पोलिस भरती असो की आरोग्य विभागामध्ये काढलेली नोकरभरती असो याबाबतीतही कुठलीच वाच्यता केलेली नाही, हा मराठा समाजावर अन्याय आहे. याबाबत आ विनायक मेटे यांनी सरकारवर हल्लाबोल करत सरकारने समाजाच्या अर्धवट मागण्याच पूर्ण केल्याचे म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले की, 'आर्थिक दुर्बल घटक आरक्षणाचा 28 जुलैचा अध्यादेश काढून त्यातुन मराठा समाजाला वगळले तो अद्यापही रद्द केला नाही. या आणि अशा अनेक गोष्टी करणे बाकी आहेत. त्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत सरकार पुर्णपणे मराठा समाजाला न्याय द्यायच्या भूमिकेत आहे असं म्हणता येणार नाही. असे आ विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटले आहे.

बातम्या आणखी आहेत...