आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी प्रकरणात कुंद्राच्या ऑफिसवर रेड:पॉर्न कन्टेंट अपलोड करणारे सर्व्हर सीज, एका दिवसात होत होती 10 लाखांपेक्षा जास्त कमाई

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका दिवसात 10 लाखांपेक्षा जास्त कमवत होते कुंद्रा

पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मुंबईतील विआन इंडस्ट्रीज लिमिटेडचे ऑफिस तसेच राज कुंद्राच्या काही इतर ठिकाणांवर छापा टाकला. ताज्या माहितीनुसार, कुंद्राच्या ऑफिसमधील काही कॉम्प्यूटरच्या हार्ड डिस्क व सर्व्हर जप्त करण्यात आले आहे. असे मानले जात आहे की, येथूनच व्ही ट्रान्सफरच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केले जात होते.

या व्यतिरिक्त काही इतर कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी कुंद्राचा एक आयफोन आणि लॅपटॉपही जप्त केला आहे. हे तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणात मुंबई पोलिस लवकरच अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी करू शकतात. कुंद्रा 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहे. याशिवाय त्याचे मेहुणे प्रदीप बक्षी याच्याविरूद्ध ‘लुकआउट’ नोटीसही बजावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बक्षी हा या प्रकरणातील सह-आरोपी आहे. बक्षी हॉटशॉट ची निर्मिती करणारी केनरीन कंपनीचा को-ओनर आहे.

पॉर्न अॅप व्यवस्थापित करण्यासाठी दरमहा 3-4 लाख रुपये चार्ज केले जात होते. तपासात समोर आले की, कुंद्राने हॉटशॉट अॅप मेंटेन करण्यासाठी प्रतिकेश आणि ईश्वर नावाच्या दोन कर्मचाऱ्यांना विआन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पेरोलवर ठेवले होते. केनरीन कंपनीच्या हॉटशॉट अॅपला मॅनेज आणि मेंटेन करण्यासाठी 'विआन इंडस्ट्रीज लिमिटेड' म्हणजेच राजच्या कंपनीला दर महिन्याला 3-4 लाख रुपये चार्ज करत होती.

एका दिवसात 10 लाखांपेक्षा जास्त कमवत होते कुंद्रा
पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अटक झालेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीच्या अटकेनंतर आणखी एक नवीन खुलासा समोर आला आहे. दिवसभरात राज कुंद्राने अनेक वेळा दहा लाखाहून अधिक कमाई केल्याचे तपासात समोर आले आहे. अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि ते ऑनलाईन अ‍ॅप्सद्वारे प्रसिद्ध केल्याप्रकरणी अटक केलेला कुंद्रा सध्या 23 जुलैपर्यंत मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या बँक खात्याचा काही तपशील सार्वजनिक करण्यात आला आहे, याच्या अॅनालिसिसवरुन असे दिसून आले आहे की कुंद्राची कंपनी एका दिवसात 50 हजार ते 10 लाख रुपये मिळवत असे.

गेल्यावर्षी कुंद्राला अशी झाली कमाई
22 डिसेंबर 2020 ला XX790 अकाउंटमध्ये 3 लाख रुपये आले.
25 डिसेंबर 2020 ला XX790 अकाउंटमध्ये 1 लाख रुपये आले.
26 डिसेंबर 2020 ला XX790 अकाउंटमध्ये 10 लाख रुपये आले.
28 डिसेंबर 2020 ला XX790 अकाउंटमध्ये 50,000 रुपये आले.
3 जानेवारी 2021 ला XX790 अकाउंटमध्ये 2 लाख 5 हजार रुपये आले.
10 जानेवारी 2021 ला XX790 अकाउंटमध्ये 3 लाख रुपये आले.
13 जानेवारी 2021 ला XX790 अकाउंटमध्ये 2 लाख रुपये आले.
20 जानेवारी 2021 ला XX790 अकाउंटमध्ये 1 लाख रुपये आले.
23 जानेवारी 2021 ला XX790 अकाउंटमध्ये 95 हजार रुपये आले.
3 फेब्रुवारी 2021 ला XX790 अकाउंटमध्ये 2 लाख 70 हजार रुपये आले.

4 फेब्रुवारी 2021 ला पोलिसांनी छापा मारुन या केसचा पर्दाफाश केला होता.

बातम्या आणखी आहेत...