आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वांद्रे गर्दी प्रकरण:सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे व्यक्तीला अटक, वांद्रे येथील घटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे सेवा सुरू झाल्याची अफवा पसरल्याने हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते

मुंबईतील वांद्रे आणि ठाण्यातील मुंब्रा येथे आज लॉकडाउनचा विरोध कऱण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी नवी मुंबईतील रहिवासी असलेल्या व्यक्तीला बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे. वियन डुबे असे व्यक्तीचे नाव असून, त्याने केलेल्या पोस्टमुळेच वांद्रे येथील रेल्वे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने लोक जमा झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी विनय याला कोर्टासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची 21 एप्रिलपर्यंत पोलिस रिमांडमध्ये रवानगी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विनय डुबे याने आपल्या सोश मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यात महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांसाठी विशेष ट्रेनची सुविधा केल्याचे म्हटले होते. तसेच, त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत म्हटले होते की, 18 एप्रिलपर्यंत महाराष्ट्र सरकारने अडकलेल्या नागरिकांना आपापल्या घरी जाण्याची सुविधा न केल्यास, राष्ट्रीय स्तरावरचे आंदोलन छेडले जाईल. यामुळे त्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आणि नंतर वांद्रे पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. त्याच्यावर भा.दं.वि. कलम 153 A (आंदोलन करणे, समजात द्वेश पसरवणे अथवा तेढ निर्माण करणे), 117 , 188 (सार्वजनिक सेवेच्या आदेशाचे उल्लंघन), 269, 270 (निष्काळजीपणाने आणि द्वेषयुक्त कृतीमुळे रोग पसरण्याचा धोका निर्माण करणे) आणि महामारी रोग कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, सध्या त्याची वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. पोलिसांना संशय आहे की, त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच  हजारो लोक वांद्रा रेल्पे स्टेशनवर जमा झाले होते. यातील बहुतेक लोक हे, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील आहेत. यादरम्यान त्या हजारो लोकांकडून सरकारने आम्हाला घरी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत होती.

काय आहे प्रकरण ?

पीएम मोदींनी 23 मार्च रोजी लागू केलेल्या लॉकडाउनचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान वांद्रे स्टेशन परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी गेली होती. आपआपल्या गावी जाण्यासाठी हे नागरिक निघाले होते. 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याची कल्पना नसणाऱ्या नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी ही गर्दी केली होती. अचानक झालेल्या गर्दीमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस ह्या नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तरीही हे नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देशभरात कोरोना व्हायरसचे संकट असतांना जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या गोष्टीचे कदाचित नागरिकांना भान राहिलेले दिसत नाही. 

बातम्या आणखी आहेत...